एक्स्प्लोर
Skin Care Tips : मोठ्या छिद्रांमुळे चेहरा खराब दिसतोय? 'हे' उपाय करा!
Skin Care Tips : चेहऱ्यावरील खुल्या छिद्रांपासून मुक्त होण्यासाठी, काही प्रभावी उपाय करणे खूप महत्वाचे आहेत, कारण जर तुम्ही असं केलं नाही तर यामुळे त्वचा आणखी खराब होऊ शकते.
Open Pors
1/6

आपल्या त्वचेवर मोठ्या प्रमाणात उघडी छिद्रे असतात, ज्यातून अतिरिक्त तेल आणि घाम बाहेर पडतात. त्वचेला पोषण आणि हायड्रेट ठेवण्याचे काम खुली छिद्रे देखील करतात.
2/6

मात्र काहीवेळा ही त्वचेची छिद्रे इतकी मोठी होतात की यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य खराब होऊ शकतं. मोठ्या छिद्रांमुळे चेहरा कुरुप दिसू लागतो आणि त्वचा देखील खराब होऊ लागते.
3/6

उघड्या छिद्रांपासून मुक्त होण्यासाठी, काही प्रभावी उपाय करणे खूप महत्वाचे आहेत, कारण जर तुम्ही असं केलं नाही तर यामुळे त्वचा आणखी खराब होऊ शकते. चेहऱ्यावरील मोठी उघडी छिद्रे कशी कमी करायची ते जाणून घेऊया.
4/6

उघड्या छिद्रांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, अधिकाधिक पाणी प्या जेणेकरुन तुमची त्वचा हायड्रेटेड राहिल. चांगला आणि मऊ फेसवॉश निवडा. कधीही मेकअप लावून झोपू नका. झोपण्यापूर्वी नेहमी मेकअप रिमूव्हरने सर्व मेकअप काढा.
5/6

जर तुम्हाला दररोज कडक उन्हात बाहेर पडावे लागत असेल तर नेहमी चेहरा झाका. कारण सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर सीबमची निर्मिती वाढू शकते आणि कोलेजन कमी होऊ शकते.
6/6

दिवसातून दोन वेळा चेहरा धुण्याची सवय लावा. जेणेकरुन त्वचेवर साचलेली सर्व प्रकारची घाण निघून जाईल. याशिवाय अशा गोष्टी खाव्यात, ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होईल.
Published at : 07 Jun 2023 01:29 PM (IST)
आणखी पाहा























