एक्स्प्लोर
Ghee Beauty Secrets : आरोग्यदायी तूप सौंदर्यासाठीही फायदेशीर, कसं ते जाणून घ्या...
Ghee Skin Care Benefits : तूप खाण्याचे विविध फायदे तुम्ही ऐकले असतील पण, तूप तुमची त्वचा सुंदर बनवण्यातही मदत करते, हे तुम्हाला माहिती आहे का?

Ghee Beauty Secrets and Skin Care Tips
1/8

तुम्ही थेट त्वचेवर तूप लावू शकता आणि याचा काहीही दुष्परिणाम होणार नाही. तुम्ही तुपाचे फेस पॅकही बनवू शकता.
2/8

तुपातील खास गुणधर्मांमुळे त्वचा ग्लोईंग होईल. तुपातील व्हिटॅमिन ए, डी आणि ई तसेच अँटिऑक्सिडंट्स चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.
3/8

तुपामध्ये व्हिटॅमिन ए आणि फॅटी ऍसिड असतात, यामुळे ते उत्कृष्ट नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. हे त्वचेला दीर्घकाळ हायड्रेशन देते आणि कोरडे त्वचेची समस्या दूर करते.
4/8

आंघोळ करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेवर हळुवारपणे तूप लावून मसाज करू शकता, यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार होईल.
5/8

डार्क सर्कलवर रोज तुप चोळल्यास तर त्वचेला चमक येऊन काळे डाग दूर होतील. याचा दररोज वापर केल्यास हळूहळू काळ्या डार्क सर्कलपासून सुटका होईल.
6/8

कोरड्या आणि फाटलेल्या ओठांच्या समस्येवर तूप खूप उपयुक्त ठरेल. मॉइश्चरायझिंग गुणधर्म असलेले तूप तुमच्या फाटलेल्या ओठांची समस्या दूर करेल. तूप लावल्याने ओठ मऊ होतात.
7/8

तुपातील काही गुणधर्म असतात त्वचेची लवचिकता सुधारतात, यामुळे त्वचा ग्लोईंग होईल. तुपातील व्हिटॅमिन ए, डी आणि ई तसेच अँटिऑक्सिडंट्स चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी प्रभावी आहेत.
8/8

तूप आणि हळदीचा फेस पॅक त्वचेसाठी सर्वोत्तम आहे. एक चमचे हळदीमध्ये 2 चमचे तूप मिसळून पेस्ट बनवा. हे चेहऱ्यावर लावून 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
Published at : 28 Jun 2023 09:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बॉलीवूड
विश्व
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
