एक्स्प्लोर
Memory Boosting Foods : रोज 'या' 5 गोष्टी खा, मेंदू राहील तंदरुस्त!
Memory Boosting Foods : काही नैसर्गिक पदार्थ असे आहेत जे मेंदूची स्मरणशक्ती वाढवतात, मूड सुधारतात आणि वृद्धत्वातही मेंदू ताजातवाना ठेवतात.
Memory Boosting Foods
1/12

आजच्या धावपळीच्या जीवनात शरीरासोबतच मेंदूची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सततचा ताण, अपूर्ण झोप आणि चुकीचा आहारामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ शकते.
2/12

पण योग्य आहार घेतल्यास मेंदू अधिक सक्रिय, लक्ष केंद्रीत आणि निरोगी राहू शकतो. काही नैसर्गिक पदार्थ असे आहेत जे मेंदूची स्मरणशक्ती वाढवतात, मूड सुधारतात आणि वृद्धत्वातही मेंदू ताजातवाना ठेवतात.
3/12

आपलं शरीर एका मशीनसारखं आहे आणि त्याला चालवण्यासाठी पोषक घटकांची गरज असते. शरीराला जशी ऊर्जा मिळवण्यासाठी अन्न आवश्यक असतं, तसंच मेंदूलाही काही विशेष पोषक तत्वांची आवश्यकता असते.
4/12

जर मेंदू निरोगी असेल, तर लक्ष केंद्रित करणे आणि आठवण ठेवणे सोपं होतं. वय वाढल्यावरही मेंदू तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग्य आहार खूप महत्त्वाचा असतो.
5/12

अनेक लोक मेंदू तंदुरुस्त ठेवण्यासाठी औषधे किंवा सप्लिमेंट्स घेतात. पण काही नैसर्गिक अन्नपदार्थही मेंदूला मजबूत ठेवण्यात मोठी मदत करतात.
6/12

संशोधनांमधून हे सिद्ध झालं आहे की, काही फळे आणि पदार्थ असे आहेत जे मेंदूची कार्यक्षमता वाढवतात.
7/12

संतरामध्ये व्हिटॅमिन C जास्त प्रमाणात आढळतात, जे मेंदूला फ्री रेडिकल्सपासून वाचवतं. रोज एक संत्रं खाल्लं तर मेंदू अधिक सक्रिय आणि ताजातवाना राहू शकतो.
8/12

ब्लूबेरीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स तुमच्या मेंदूला नुकसानापासून संरक्षण देतात आणि स्मरणशक्ती वाढवतात.
9/12

हळदीत असलेले करक्यूमिन हे घटक मेंदूसाठी औषधासारखे काम करतात. ते मेंदूतील सूज कमी करून मूड सुधारतात आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करतात.
10/12

भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, झिंक आणि आयरन भरपूर प्रमाणात असतात. जे मेंदूच्या मूड आणि स्मरणशक्तीसाठी आवश्यक असतात.
11/12

दैनिक आहारात हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा आणि अंडी यांचा समावेश केल्याने मेंदू तंदुरुस्त राहतो. फास्ट फूड आणि जास्त मीठ-गोड पदार्थ टाळल्यास मेंदूची कार्यक्षमता दीर्घकाळ टिकून राहते.
12/12

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 10 Nov 2025 03:15 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
भारत
व्यापार-उद्योग
























