एक्स्प्लोर
निखळ व तजेलदार त्वचेसाठी जाणून घ्या हळदीचे फायदे!
हळद ही भारतीय घराघरातील पारंपरिक सौंदर्य रहस्य मानली जाते. तिच्यातील अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला आतून पोषण देतात.
हळदीचे फायदे
1/8

हळद ही आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात उपयुक्त गोष्ट आहे.
2/8

पण तीव्र औषधी गुणधर्मांमुळे त्वचेसाठीही ती अतिशय फायदेशीर ठरते.
3/8

हळदीतील करक्यूमिन हे घटक त्वचेला नैसर्गिक तेज देतात, पिंपल्स व मुरुमांवर नियंत्रण ठेवतात आणि त्यानंतर राहिलेले काळे डाग कमी करतात.
4/8

हळदीमुळे त्वचेचा रंग समान होतो, टॅनिंग कमी होते आणि सुरकुत्या व बारीक रेषा दूर राहतात.
5/8

अँटीबॅक्टेरियल व अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे हळद त्वचेला संसर्गापासून वाचवते, तसेच कोरडी त्वचा मऊ व तजेलदार बनवते.
6/8

घरगुती फेसपॅकसाठी हळद दही मध, गुलाबपाणी किंवा अलोव्हेरासोबत वापरल्यास त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो.
7/8

हळदीतील औषधी गुणधर्मामुळे त्वचेवर बॅक्टेरिया वाढत नाहीत, त्यामुळे पिंपल्स कमी होतात आणि त्वचा स्वच्छ दिसते.
8/8

हळद त्वचेला इन्फेक्शनपासून सुरक्षित ठेवते, विशेषतः पावसाळ्यातील बुरशीजन्य त्रासापासून. (टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 26 Sep 2025 04:02 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























