एक्स्प्लोर
Weight Balancing Tips : बेसनाची चपाती मधुमेह आणि वजन नियंत्रणासाठी आरोग्याचा खजिना!
Weight Balancing Tips : बेसनाची चपाती स्वादिष्ट, आरोग्यदायी आणि बनवायला सोपी आहे; ती मधुमेह, वजन, हृदय आणि पोटासाठी फायदेशीर आहे.
Health Tips
1/11

आपल्या रोजच्या आहारात चपातीचा समावेश असतोच. यामध्ये गव्हाची चपाती अनेकजण खातात. कारण ती आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे असं मानलं जातं.
2/11

पण तुम्हाला माहिती आहे का? गव्हाच्या चपातीशिवाय बेसनाची चपातीही स्वादिष्ट असते आणि ती आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
3/11

बेसनाची चपाती आपल्या शरीराला मजबूत करते आणि मधुमेह तसेच वजन कमी करण्यासाठी मदत करते. बेसनाच्या चपातीचे फायदे नेमके काय ते जाणून घेऊयात.
4/11

गव्हाच्या ऐवजी तुम्ही बेसनाची चपाती खाऊ शकता कारण ती तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
5/11

बेसनात भरपूर फायबर असतं, जे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि हृदयाचे आरोग्य सुधारतं. त्यामुळे बेसनाची चपाती आपल्या हृदयासाठी भरपूर फायदेशीर ठरू शकते.
6/11

बेसनाच्या चपातीमुळे शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. त्यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने साखर हळुहळू वाढते. त्यामुळे ती मधुमेहींसाठी खूप फायदेशीर आहे.
7/11

वजन कमी करण्यासाठी बेसनाची चपाती हा खूप चांगला पर्याय आहे. कारण यामुळे पोट भरलेले राहतं तसेच लवकर भूकही लागत नाही.
8/11

बेसनाची चपाती आपल्या पोटासाठी खूप चांगली आहे. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. पचन सुधारतं तसेच, यामुळे शरीरातील विषारी पदार्थ दूर होतात.
9/11

बेसनात भरपूर प्रमाणात फायबर आणि मिनरल्स असतात. ते शक्ती वाढवतं आणि हिमोग्लोबिन टिकवतं.
10/11

बेसनाची चपाती बनवायला खूप सोपी आहे. बेसनात मीठ, कांदा, हिरवी मिरची आणि धणे घाला. त्यानंतर त्याचं कणिक करुन, ती चपाती लाटून तव्यावर शेका.
11/11

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 25 Oct 2025 04:28 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























