एक्स्प्लोर
पिंक सिटी जयपूरमध्ये पावसाचा धुमाकूळ; भूस्खलनामुळे शहरांतील रस्त्यांवर मातीचे ढिगारे
1/8

मुसळधार पावसामुळे डोंगरांवरून वाहून आलेल्या मातीचे शहरातील रस्त्यांवर ढिगारे जमा झाले.
2/8

पावसाचा जोर एवढा होता की, घराबाहेर पार्किंगमध्ये उभी असलेली वाहनंही लोक सुरक्षित स्थळी पोहोचवू शकले नाहीत.
3/8

सिविल डिफेंस आणि एसजीआरएफची 30 व्हॉलेंटियर्सची टीम मातीच्या खाली गाडली गेलेली वाहनं आणि मृतदेह काढण्याचं काम करत आहेत.
4/8

पुरस्थितीमुळे शहरात झालेल्या भूस्खलनामुळे शहरात मातीचे ढिगारे पसरले आहेत. मातीच्या ढिगाऱ्यांखालून अनेक गाड्या बाहेर काढण्यात येत आहेत.
5/8

मुसळधार पावसामुळे शहरातील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे.
6/8

जयपुरमध्ये मुसळधार पावसामुळे ओढावलेल्या पुरस्थितीचं वास्तव दर्शवणारा फोटो
7/8

राजस्थानची राजधानी जयपूरमधील मुसळधार पावासाची भिषणता दाखवणारे फोटो समोर आले आहेत. शहरातील रस्त्यावर उभी असलेली वाहनं पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्याचं या फोटोंमध्ये दिसत आहे. शहरात गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस झाला होता, त्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. फोटोंमध्ये असं वाटत आहे की, शहरांमधून नदीचा प्रवाह वाहत आहे. मातीच्या खाली अडकलेली वाहनं बाहेर काढण्यासाठी लोकांना फार कष्ट करावे लागले. तसेच मोठ्या प्रमाणावर नुकसानही झालं आहे.
8/8

जयपुरमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत जवळपास 8 लोकांचा मृत्यू झाला आहे.
Published at :
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























