शेतकरी आज संपूर्ण दिवस उपोषण करतील. त्यांचं म्हणणं आहे की, जोपर्यंत सरकार हे कायदे मागे घेत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम राहणार असून आंदोलनही सुरु ठेवणार आहोतं, असं शेतकरी संघटनांनी सांगितलं आहे.
2/8
शेतकरी सरकारद्वारे लागू करण्यात आलेल्या कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत आहेत.
3/8
शेतकरी संघटना आज देशभरातील सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांसमोर धरणं आंदोलन करणार आहेत.
4/8
सर्व आंदोलक शेतकरी संघटनांचे प्रमुख आज उपोषणासाठी बसले आहेत.
5/8
शेतकऱ्यांचं उपोषण आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरु झालं असून संध्याकाळी पाच पर्यंत सुरु राहणार आहे.
6/8
कृषी कायद्याविरोधात सुरु असलेलं शेतकरी आंदोलन दिवसागणिक अधिक तीव्र होत आहे.
7/8
शेतकरी आंदोलनाचा आज एकोणवीसावा दिवस आहे.
8/8
देशभरात शेतकऱ्यांचं आंदोलन आता आणखी तीव्र झालं आहे. दिल्लीच्या वेशींवर गेले अठरा दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन आणखी तीव्र केलं आहे. शेतकरी आज सकाळी उपोषणासाठी बसले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे लागू केले आहेत. ते रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.