एक्स्प्लोर
In Pics: 'मन झालं बाजिंद' मालिकेतील राया-कृष्णाच्या गाडीचा अपघात
(Photo:@zeemarathiofficial/FB)
1/6

आजवर मालिकांमध्ये प्रेमाचा रंग गुलाबी असलेला पाहायला मिळाला आहे. पण 'मन झालं बाजिंद' मालिकेतील राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. (Photo:@zeemarathiofficial/FB)
2/6

नुकतेच राया आणि कृष्णाचे लग्न झाले आहे. गुरुजींच्या भाकिताप्रमाणे रायाची पहिली बायको ही अल्पायुषी ठरणार आहे. लग्न होताच वऱ्हाडाच्या बसचा अपघात होतो पण त्यातून कृष्णा वाचते.(Photo:@zeemarathiofficial/FB)
3/6

दिवाळी मध्ये देखील कृष्णाचा पदर पेट घेतो तेव्हा देखील राया तिला वाचवतो. पण पुढे काही अघटित घडलं तर त्यातून कृष्णा सुखरूप बाहेर पडेल का? हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे. (Photo:@zeemarathiofficial/FB)
4/6

राया आणि कृष्णा घरच्यांबरोबर कुलदेवीच्या दर्शनाला जातात. पण वाटेत राया-कृष्णाच्या गाडीचा अपघात होतो. (Photo:@zeemarathiofficial/FB)
5/6

कृष्णा गाडीतून बाहेर फेकली जाते आणि रायाला कृष्णा दिसेनाशी होते. कृष्णाच्या जीवाला असलेला धोका टळेल की गुरुजींचं भाकीत खरं ठरेल? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे. (Photo:@zeemarathiofficial/FB)
6/6

'मन झालं बाजिंद' मालिका लवकरच रंगतदार वळणे घेणार आहे. (Photo:@zeemarathiofficial/FB)
Published at : 10 Nov 2021 08:37 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















