बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीत खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

Beed News: बीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
इतर महत्वाच्या बातम्या























