सीए होण्याचं त्यांचं स्वप्न होतं. पण, अभिनयाकडेच जास्त कल असल्यामुळं त्यांनी सीएचा अभ्यास अर्ध्यावरच सोडला. श्याम आणि त्यांच्या पत्नीची भेटही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधलीच. (छाया सौजन्य- ट्विटर)
2/5
'तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत मानधनाच्या बाबतीत सांगावं तर, जेठालाल अर्थात अभिनेता दिलीप जोशी हे एका भागासाठी तब्बल 1.5 लाख रुपये इतकं मानधन घेतात. मालिकेत त्यांना सर्वाधिक मानधन दिलं जातं, अशीची चर्चा कलाविश्वात आहे.
3/5
मालिकेच्या एका भागासाठी श्याम 60 हजार रुपये इतकं मानधन घेतात असं म्हटलं जातं. त्यांच्याकडे स्वत:ची अशी आलिशान मर्सिडीज कारही आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून त्यांनी अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. 'जसुबेन जयंती लाल जोशी की जॉइंट फैमिली' या मालिकेतूनही ते झळकले होते.
4/5
ही झाली मालिकेतील गोष्ट. पण, खऱ्याखुऱ्या आयुष्यात हा अभिनेता विवाहित आहे बरं. त्यांचं नाव आहे, श्याम पाठक. श्याम यांना तीन मुलं आहेत. काही संकेतस्थळावरील माहितीनुसार त्यांची कोट्यवधींची संपत्तीही आहे.
5/5
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमुळं त्यातून झळकणारं प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनाच्या अधिकच जवळचं. मागील कित्येक वर्षांपासून रसिकांमध्ये लोकप्रियता मिळवणाऱ्या या कार्यक्रमातील एक पात्र, म्हणजेच पत्रकार पोपटलाल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण अखेर, या पोपटलाल विवाहबंधनात अडकणार आहे.