एक्स्प्लोर
स्टाईल फेम अभिनेत्याचं 26 वर्षांनी लहान असलेल्या पत्नीसोबत हटके फोटोशूट, इन्स्टाग्रामवर खास पोस्ट करत म्हणाला...
Style fame actor Sahil Khan : स्टाईल फेम अभिनेता साहिल खान याने पत्नीसोबत खास फोटोशूट केलंय.
SAHIL KHAN
1/6

स्टाईल फेम अभिनेता साहिल खान त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. सध्या त्याने पत्नीसोबत काही खास फोटो शेअर केले आहेत. नेटकऱ्यांनी साहिल खानने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
2/6

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी साहिल खानने त्यांच्या प्रेयसी मिलिना अलेक्झेंड्राशी दुसरं लग्न केलं होतं.
3/6

त्यानंतर दुबईतील बुर्ज खलिफामध्ये त्यांनी भव्य रिसेप्शन आयोजित केलं होतं, ज्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते.
4/6

साहिल खान यांनी केवळ 1-2 नव्हे तर तब्बल 26 वर्षांनी लहान असलेल्या मुलीशी लग्न केलं आहे. ही गोष्ट लोकांना समजल्यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या. एका अलीकडच्या मुलाखतीत साहिल म्हणाले की, वय प्रेमाला परिभाषित करत नाही. आमची कहाणीही अशीच आहे. माझ्या मते प्रेमाचा संबंध हा समजूतदारपणा आणि परस्पर समन्वयावर आधारित असतो.
5/6

साहिल यांनी पुढे सांगितलं की, आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो, तेव्हा मिलिना केवळ 21 वर्षांची होती. त्यांनी सांगितलं की, पहिल्यांदा त्यांनी मिलिनाला मॉस्कोमधल्या एका रेस्टॉरंटमध्ये तिच्या आईसोबत डिनर करताना पाहिलं. त्याच वेळी मी देखील तिथे माझ्या मित्रांसोबत होतो. त्यानंतर मी तिला मॉडेलिंग आणि फोटोशूटचं ऑफर दिलं, पण तिने नकार दिला. मिलिनाने स्पष्टपणे सांगितलं की, तिला त्यात रस नाही आणि ती अशा व्यक्तीच्या शोधात आहे, जिच्यासोबत ती लग्न करून आपलं घर बसवू शकेल.
6/6

साहिल म्हणाले की, तिचं हे उत्तर मला खूप आवडलं आणि त्याच वेळी वाटलं की मला हिच्याशी लग्न करायचं आहे. पुढे त्यांनी सांगितलं की, मिलिनाला पाहिल्याक्षणीच मला तिच्याविषयी आकर्षण वाटलं. आणि मला असंही वाटत होतं की तिलाही तसंच वाटत होतं. वयाच्या फरकावर त्यांनी सांगितलं की, मिलिना तिच्या वयाच्या तुलनेत खूपच मॅच्युअर आहे. आम्ही दोघांनी आमच्या नात्याबद्दल गंभीरपणे चर्चा केली. एकमेकांच्या कुटुंबीयांशी भेटलो आणि आता मिलिना अलेक्झेंड्रा खान ही माझी पत्नी आहे.
Published at : 21 Jul 2025 07:18 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























