एक्स्प्लोर

Nagarparishad Election Result: मोठी बातमी : उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय, निकालाची नवी तारीखही जाहीर!

Nagarparishad Election Result: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतबाबत महत्त्वाची अपडेट, नागपूर खंडपीठाने 21 डिसेंबरला निकाल जाहीर करण्याचे आदेश

Maharashtra Nagarparishad Election Result: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला होणार होती. त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा 20 नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याबाबतचा सगळा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. आज मतदान झालं तरी त्याचे निकाल 21 तारखेला जाहीर करा. तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोलही 20 तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्धा तासाने जाहीर करता येतील. तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही 20 डिसेंबरपर्यंत लागू राहील, असे न्यायालयाने सांगितले. 

ज्या ठिकाणी निवडणूक रद्द झाली त्या ठिकाणी असलेल्या उमेदवारांना आत्ताच्या प्रक्रियेत जे निवडणूक चिन्ह मिळाले होते त्यांचे ते निवडणूक चिन्ह कायम राहणार आहे. मात्र, निवडणूक रद्द झालेल्या ठिकाणी उमेदवारांनी जे खर्च केले आहे त्यांची खर्चाची मर्यादा वाढवून देण्यात यावी ही मागणी न्यायालयाकडून मान्य झालेली नाही.

Devendra Fadnavis on Election Result: देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगावर प्रचंड नाराज

घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत, त्याचा निकाल पुढे जातोय, हे पहिल्यांदाच होतंय. हे यंत्रणांचं अपयश आहे. निवडणूक आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी. मी पहिल्यांदाच अशी निवडणूक पाहतोय. मतमोजणी पुढे ढकलणे हे मला तरी पटत नाही. हे अतिशय चूक आहे, माझी वैयक्तिक नाराजी मी व्यक्त केली होती ती कायद्यावर आधारित होती. माझी नाराजी निवडणूक आयोगावर नाही तर प्रक्रियेवर आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 

Nagarparishad Election Result: निकालाची तारीख पुढे गेल्यामुळे काय परिणाम होणार?

* प्रशासनाला ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी चे स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र 21 डिसेंबरपर्यंत राखीव ठेवावे लागतील..
* ही निवडणूक जवळपास 280 ठिकाणांवर होत असल्याने आणि प्रत्येकाची मतमोजणी स्वतंत्र ठिकाणी  वेगवेगळ्या शहरात असल्याने जवळपास 280 पेक्षा जास्त मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूम 21 डिसेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागेल..
* शिवाय सर्व स्ट्रॉंग रूममध्ये तेवढे दिवस ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी चा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागेल..
* स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम असताना निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना रोज स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊन पाहणी करणे आणि स्वाक्षरी करणे बंधनकारक असते.. ती प्रक्रिया रोज 21 डिसेंबर पर्यंत पार पाडावी लागेल.
* विधानसभेला साधारणपणे  288 ठिकाणी मतमोजणी असते, जवळपास तेवढेच मतमोजणी ठिकाण नगर परिषद निवडणुकीत आहेत.. मात्र, लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे विधानसभेची मतमोजणी वोटिंग नंतर लगेच एक किंवा दोन दिवसात होते..
* म्हणजे आज मतमोजणी समोर ढकलली गेली, तर विधानसभा निवडणूक सुमारे तीन आठवडे सांभाळावी एवढी प्रशासन आणि पोलिसांची यंत्रणा कामी लागेल..

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
Mumbai Pune Expressway: वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
चांदा ते बांदा बिबट्यांच्या हैदोसावर वनमंत्र्यांकडून थेट एक कोटी शेळ्यांचा नजराणा, अजित पवारांनी फक्त एका वाक्यात विषय संपवला
चांदा ते बांदा बिबट्यांच्या हैदोसावर वनमंत्र्यांकडून थेट एक कोटी शेळ्यांचा नजराणा, अजित पवारांनी फक्त एका वाक्यात विषय संपवला
Indigo Airlines Crisis: प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या मक्तेदारीची चौकशी होणार; हवाई क्षेत्रात 65 टक्के हिस्सा, दररोज 2200 उड्डाणे
प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या मक्तेदारीची चौकशी होणार; हवाई क्षेत्रात 65 टक्के हिस्सा, दररोज 2200 उड्डाणे
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Pc : वंदे मातरमबाबत चर्चेवेळी भाजप, संघाचे बुरखे फाटले, संजय राऊतांचा घणाघात
Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
Mumbai Pune Expressway: वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
चांदा ते बांदा बिबट्यांच्या हैदोसावर वनमंत्र्यांकडून थेट एक कोटी शेळ्यांचा नजराणा, अजित पवारांनी फक्त एका वाक्यात विषय संपवला
चांदा ते बांदा बिबट्यांच्या हैदोसावर वनमंत्र्यांकडून थेट एक कोटी शेळ्यांचा नजराणा, अजित पवारांनी फक्त एका वाक्यात विषय संपवला
Indigo Airlines Crisis: प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या मक्तेदारीची चौकशी होणार; हवाई क्षेत्रात 65 टक्के हिस्सा, दररोज 2200 उड्डाणे
प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या मक्तेदारीची चौकशी होणार; हवाई क्षेत्रात 65 टक्के हिस्सा, दररोज 2200 उड्डाणे
Pune BJP : उमेदवार देण्यासाठी भाजप पदाधिकारी अन् स्थानिक नेत्यांची दमछाक; 125 जागांसाठी भाजपने कंबर कसली, 2500 उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू
उमेदवार देण्यासाठी भाजप पदाधिकारी अन् स्थानिक नेत्यांची दमछाक; 125 जागांसाठी भाजपने कंबर कसली, 2500 उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू
Raj Thackeray: वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला... मनसेप्रमुख राज ठाकरे संतापले, स्पष्टच सुनावलं
वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला... मनसेप्रमुख राज ठाकरे संतापले, स्पष्टच सुनावलं
IND vs SA 3rd T20 : शुभमन गिल OUT, संजू सॅमसन IN... पराभवानंतर द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
शुभमन गिल OUT, संजू सॅमसन IN... पराभवानंतर द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
Weather Update: पुण्यासह साताऱ्यात मिनी काश्मीरचा फील; थंडीच्या अलर्टमुळे शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी, पारा आणखी घसरण्याची शक्यता
पुण्यासह साताऱ्यात मिनी काश्मीरचा फील; थंडीच्या अलर्टमुळे शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी, पारा आणखी घसरण्याची शक्यता
Embed widget