एक्स्प्लोर

Mumbai Police News : मुंबईत फूटपाथवर चालताना गर्भवतीला वेदना; चालताही येईना.., पोलिसांची घटनास्थळी धाव, वस्त्रांचा केला आडोसा अन्... महिला पोलीस कॉन्स्टेबलमुळे सुखरुप प्रसुती

Mumbai Police News : डॉक्टरांनी तपासणी करून आई व बाळ दोघेही सुखरूप असल्याचे स्पष्ट केले. या घटनेनंतर मुंबई पोलिसांकडून एक्स पोस्ट करत महिला कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या डोंगरी (Mumbai News) परिसरात फुटपाथवरच महिलेची प्रसुती झाल्याची घटना समोर आली आहे. डोंगरीच्या फुटपाथवर गरोदर असलेल्या महिलेला प्रसुतीच्या कळा येत होत्या. त्यावेळी स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना देताच, डोंगरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी महिला पोलिसांनी स्थानिकाच्या मदतीने महिलेला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. मात्र रस्त्यातच महिलेची प्रसुती झाली. त्यावेळी उपस्थित महिलांच्या मदतीने महिला पोलिसांनी (Mumbai Police) बाळ आणि आईला तात्काळ जे जे रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासणी करून आई व बाळ दोघेही सुखरूप असल्याचे स्पष्ट केले. या घटनेनंतर मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) एक्स पोस्ट करत महिला कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

Mumbai Police News : मुंबई पोलिसांनी पोस्ट करत दिली घटनेची माहिती

डोंगरी परिसरातील उमरखाडी येथे एका महिलेला फुटपाथवर प्रसूती वेदना होत असल्याचे कळताच, @DongariPSचे अधिकारी ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. प्रसूतीनंतर, महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी स्थानिक महिलांच्या मदतीने आई आणि नवजात बाळाला सुरक्षितपणे सर जे.जे. रुग्णालयात नेले. आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती आता चांगली आहे.

Mumbai Police News : नेमकं काय घडलं?

डोंगरी परिसरातून चालत जात असतानाच अचानकपणे गर्भवती महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या आणि ती फुटपाथवर बसली. वेदनेने विव्हळणाऱ्या महिलेबाबत समजताच डोंगरी पोलिस त्या ठिकाणी पोहोचले. जवळच्या रुग्णालयात नेण्याची हालचाल सुरू असतानाच वेदना आणखी वाढल्या आणि महिलेची प्रसूती झाली. पोलिसांनी स्थानिक महिलांच्या मदतीने वस्त्र घेऊन या ठिकाणी आडोसा निर्माण केला. ताबडतोब दोघांना वस्त्रामध्ये अलगद गुंडाळून जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी बाळाची नाळ कापली. बाळ, बाळंतीण सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.

धारावी येथे वास्तव्यास असलेली ३६ वर्षीय माला नाडर ही गर्भवती महिला पतीसोबत शनिवारी डोंगरी परिसरातून चालली होती. अचानक पोटात दुखू लागल्याने फुटपाथवर बसली, तिला चालताही येईना. स्थानिकांनी वेदनेने विव्हळत असलेल्या महिलेला पाहून डोंगरी पोलिसांना कळविले. डोंगरी पोलिसांच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. प्रसूती वेदना वाढत असल्याने चालता येत नसल्याचे माला आणि तिच्या पतीने सांगितले. पोलिस कॉन्स्टेबल खडसे यांनी चादर तसेच इतर वस्त्रांची व्यवस्था केली. महिला पोलिस कॉन्स्टेबलनी चारही बाजूने आडोसा केला. याचदरम्यान गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिला.

Mumbai Police News : दोघेही सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर सर्वांनी आंनद व्यक्त केला

प्रसूती झाल्यावर नाळ कापणे महत्त्वाचे होते. त्यामुळे महिला पोलिसांनी माला यांना बाळासह कपड्यात लपेटले. स्थानिक महिलांच्या मदतीने पोलिसांनी बाळ आणि बाळंतिणीला अलगद गाडीमध्ये ठेवले आणि जवळच्या जे. जे. रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्वरीत उपचाराला सुरूवात केली. बाळाची नाळ कापून बाळाला मातेपासून वेगळे केले. पोलिसांनी वेळ न घालवता माला आणि तिच्या मुलास रुग्णालयात नेल्याने त्यांना वेळीच योग्य ते उपचार मिळाले. दोघेही सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर सर्वांनी आंनद व्यक्त केला.

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
Maharashtra Flood Aid: शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका
शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका
Weather Update: नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट; राज्यात पारा आणखी घसरणार; हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट; राज्यात पारा आणखी घसरणार; हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?
Ind vs SA 2nd T20 Team India Playing XI: संजू सॅमसन IN, तिलक वर्मा OUT...द. अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
संजू सॅमसन IN, तिलक वर्मा OUT...द. अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
Maharashtra Flood Aid: शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका
शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका
Weather Update: नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट; राज्यात पारा आणखी घसरणार; हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट; राज्यात पारा आणखी घसरणार; हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?
Ind vs SA 2nd T20 Team India Playing XI: संजू सॅमसन IN, तिलक वर्मा OUT...द. अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
संजू सॅमसन IN, तिलक वर्मा OUT...द. अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
Sahyadri Hospital Vandalised : पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल; रूग्णालयाने दिलं घटनेबाबत स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल; रूग्णालयाने दिलं घटनेबाबत स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?
Mahayuti Municipal Corporation Election 2025: आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला; मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत भाजपा-शिवसेना एकत्र; पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी-भाजपा वेगवेगळे लढणार
आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला; मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत भाजपा-शिवसेना एकत्र; पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी-भाजपा वेगवेगळे लढणार
Pune Election : बंडू आंदेकर कुटूंबातील दोघी महानगरपालिकेची निवडणूक लढवणार; लक्ष्मी आंदेकर अन् सोनाली आंदेकरला निवडणूक लढविण्यास न्यायालयाचा 'ग्रीन सिग्नल'
बंडू आंदेकर कुटूंबातील दोघी महानगरपालिकेची निवडणूक लढवणार; लक्ष्मी आंदेकर अन् सोनाली आंदेकरला निवडणूक लढविण्यास न्यायालयाचा 'ग्रीन सिग्नल'
Mahadhan Yog 2025 : 20 डिसेंबरची तारीख लक्षात ठेवा! शुक्र ग्रहाचा जुळून येणार अद्भूत राजयोग, नशिबाचे फास फिरण्यासाठी फक्त 10 दिवस बाकी
20 डिसेंबरची तारीख लक्षात ठेवा! शुक्र ग्रहाचा जुळून येणार अद्भूत राजयोग, नशिबाचे फास फिरण्यासाठी फक्त 10 दिवस बाकी
Embed widget