रिअॅलिटी शो असो किंवा मग एखाद्या खास कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती असो, जेठालालची ही स्टाईल स्टेटमेंट मात्र कधीही बदलत नाही. (सर्व छायाचित्र- इन्स्टाग्राम)
2/7
मालिकेमध्ये जेठालाल अनेकदा म्हणताना दिसतो, की ही शर्ट अहमदाबाहून मागवली आहेत. पण मुळात तसं नसून, ही शर्ट डिझाईन करणारी व्यक्ती मात्र गुजरातची आहे हे खरं.
3/7
2008 मध्ये, मालिकेची सुरुवात झाल्या दिवसापासून लखानीच जेठालाल यांच्यासाठी शर्ट डिझाईन करत आहेत. मालिकेच्या दैनंदिन भागांसाठी शर्टचं डिझाईन सोबरच ठेवलं जातं, पण एखादा खास क्षण किंवा सण असल्यास मात्र हे डिझाईन काहीसं रंजक आणि कलात्मक करण्यावर भर दिला जातो.
4/7
जेठालाल यांच्या या अनोख्या आणि रंगीबेरंगी स्टाईल स्टेटमेंटमागे मुंबईच्याच जीतूभाई लखानी यांचा हात आहे अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळत आहे.
5/7
रंगीबेरंगी शर्ट, त्यावर असणारं डिझाईन अनेकदा सर्वसामान्यांना गडद वाटलं तरीही या भूमिकेसाठी मात्र हेच स्टाईल स्टेटमेंट अगदी योग्य पद्धतीनं शोभून दिसतं ही बाबही नाकारता येत नाही.
6/7
जेठालालचं बोलणं आणि त्याचा एकंदर अंदाजच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतं. यातही विशेष लक्ष वेधून जाते ती म्हणजे जेठाभाईची ड्रेसिंग स्टाईल. जेठालालचे शर्ट आणि त्याची रंगसंगती ही काही औरच.
7/7
काही मालिका आणि त्या मालिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी पात्र ही खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. असंच एक पात्र म्हणजे 'जेठालाल'. 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेतून मागिल बऱ्याच वर्षांपासून अभिनेता दिलीप जोशी यांनी या पात्राला न्याय दिला आहे.