एक्स्प्लोर
Prarthana Behere : प्रार्थना बेहेरेच्या हॉटनेसने चाहत्यांना लावलं वेड; शेअर केला हॉट लूक!
प्रार्थना बेहेरेचा गोव्यात आजवरचा सर्वात हॉट अवतार!
Prarthana Behere
1/10

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीतही तिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने छाप पाडली आहे.
2/10

'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून प्रार्थना घराघरांत पोहोचली. पण आता अभिनेत्री एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
3/10

प्रार्थना बेहेरे सध्या कुटुंबातील महिलांसोबत गोव्याला फिरायला गेली आहे. गोव्यातील फोटो लगेचच अभिनेत्रीने सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहेत.
4/10

या फोटोंमधील अभिनेत्रीच्या हॉटनेसने चाहत्यांना वेड लावलं आहे. विशेष म्हणजे चाहत्यांचा रोष नको म्हणून अभिनेत्रीने कमेंट्सदेखील ब्लॉक केल्या आहेत.
5/10

प्रार्थना बेहेरेचा गोव्यात आजवरचा सर्वात हॉट अवतार पाहायला मिळाला आहे. गोव्यातील चिलिंग मूडमधील फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पल्लवी भिडेने (Pallavi Bhide) प्रार्थनाचे हे फोटो काढले आहेत.
6/10

फोटो शेअर करत प्रार्थनाने "When in Goa...!!", असं कॅप्शन दिलं आहे. तर गर्ल्स ट्रिप, मी टाइम, सेल्फकेअर, हॅपीनेस, असे हॅशटॅग वापरले आहेत. बोल्ड फोटोंमुळे आपण ट्रोल होऊ म्हणून प्रार्थनाने कमेंट्स ब्लॉक केल्या आहेत. त्यामुळे अभिनेत्रीच्या फोटोवर चाहते काहीही कमेंट करू शकत नाही.
7/10

अभिनेत्रीने फोटो शेअर केल्या केल्या सोशल मीडियावर तो व्हायरल झाला आहे. अभिनेत्रीचा बीच लूक चाहत्यांचा पसंतीस उतरला आहे. प्रार्थनाचे हे फोटो 124K चाहत्यांनी लाईक्स केले आहेत.
8/10

प्रार्थना बेहेरेने गोव्यातील आणखी काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधील मराठमोळ्या अभिनेत्रीचा लूक लक्षवेधी आहे. गुलाबी क्रॉप टॉप आणि कलरफुल स्कर्ट आणि गॉगल असा सिंपल पण आकर्षक लूक अभिनेत्रीने क्रिएट केला आहे.
9/10

अभिनेत्रीच्या या लूकमधील फोटोंवर चाहत्यांना कमेंट्स करता येत आहेत. डोळ्याची खुशी, काय करायचं तुझ्या सौंदर्याचं, या फोटोमध्ये काही मजा नाही, सुंदर, हॅलो हॉटी, खूपच सुंदर दिसत आहेस, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 63.2K लोकांनी प्रार्थनाचा हा फोटो लाईक केला आहे. तसेच कमेंट्सचाही वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे.
10/10

प्रार्थना बेहेरेचा 'मितवा','मिस्टर अॅन्ड मिसेस सदाचारी','कॉफी आणि बरंच काही' असे अनेक चित्रपट चांगलेच गाजले आहेत. अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. प्रार्थनाच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. (all photo::prarthana.behere/ig)
Published at : 13 Apr 2024 02:25 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा

















