एक्स्प्लोर
Kartik Aryan Covid Positive: अभिनेता कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन दिली माहिती!

(photo:kartikaaryan/ig)
1/6

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनला (Kartik Aaryan) कोरोनाची लागण झाली आहे. कार्तिक हा सध्या त्याच्या भूल भुलैय्या-2 (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. (photo:kartikaaryan/ig)
2/6

या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. IIFA 2022 मध्ये कार्तिक हा सहभाग घेणार होता. आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कार्तिकनं कोरोनाची लागण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. (photo:kartikaaryan/ig)
3/6

कार्तिकनं त्याचा एक फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'सगळं एवढं पॉझिटिव्ह सुरू होतं, त्यामुळे कोरोनाला पण राहावलं नाही. ' (photo:kartikaaryan/ig)
4/6

कार्तिकला याआधी देखील कोरोनाची लागण झाली होती. भूल भुलैय्या-2 च्या शूटिंग दरम्यान कार्तिकला कोरोनाची लागण झाली होती. पण नंतर कार्तिकचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. लवकर कार्तिकचा शहजादा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. (photo:kartikaaryan/ig)
5/6

कार्तिकचा भूल भुलैय्या-2 सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं आत्तापर्यंत जगभरात 200 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. (photo:kartikaaryan/ig)
6/6

या चित्रपटामध्ये कार्तिकसोबतच कियारा अडवाणी आणि तब्बू यांनी प्रमुख भूमिका साकारली. पहिल्या आठवड्यात भूल भूलैय्या-2 या चित्रपटानं 92.05 कोटी एवढी कमाई केली. तर आठव्या दिवशी 6.52 कोटी आणि नवव्या वर्षी 11.35 कोटी कमाई या चित्रपटानं केली. (photo:kartikaaryan/ig)
Published at : 04 Jun 2022 05:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बुलढाणा
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
