एक्स्प्लोर
जिनिलिया देशमुखला एक मराठमोळा पदार्थ प्रचंड आवडतो; जाणून घेऊया!
आता जिनिलिया देशमुखचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जिनिलिया देशमुख आपल्या आवडत्या पदार्थाबद्दल भाष्य करताना दिसत आहे.

(photo:geneliad/ig)
1/10

: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. (photo:geneliad/ig)
2/10

महाराष्ट्राचे ते लाडके दादा-वहिनी आहेत. साऊथ, हिंदीसह मराठी मनोरंजनसृष्टीतही त्यांचा दबदबा आहे. (photo:geneliad/ig)
3/10

सोशल मीडियावर दोघेही सक्रीय आहेत. दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर नेहमीच ते एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. (photo:geneliad/ig)
4/10

आता जिनिलिया देशमुखचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जिनिलिया देशमुख आपल्या आवडत्या पदार्थाबद्दल भाष्य करताना दिसत आहे. जिनिलिया देशमुखला एक मराठमोळा पदार्थ आवडतो.(photo:geneliad/ig)
5/10

जिनिलिया देशमुखचा आवडता मराठमोळा पदार्थ ऐकूण महाराष्ट्रातील (Maharashtra) तिच्या चाहत्यांना वेड लागलं आहे. (photo:geneliad/ig)
6/10

विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची सून, बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखची (Riteish Deshmukh) पत्नी तसेच दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टी गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री अशी जिनिलिया देशमुखची ओळख आहे. (photo:geneliad/ig)
7/10

'वेड' (Ved) या चित्रपटाच्या माध्यमातून जिनिलियाने मराठी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. अभिनेत्रीच्या या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. या सिनेमातील तिचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.(photo:geneliad/ig)
8/10

मोठे सेलिब्रिटी पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतात असा सर्वसामान्यांचा समज आहे. पण अनेक कलाकारांना महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाण्यापेक्षा स्ट्रीट फूड खायला आवडतं. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनादेखील भटकंती करण्याची आणि तिथले लोकल पदार्थ खायला आवडतात. तसेच दोघेही प्रचंड फुडी आहेत. (photo:geneliad/ig)
9/10

काही दिवसांपूर्वी 'कर्ली टेल्स' या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत जिनिलिया देशमुखने आपला आवडता पदार्थ सांगितला आहे. (photo:geneliad/ig)
10/10

महाराष्ट्रीयन थाळीमध्ये असणारा जवस आणि ठेचा आवडत असल्याचं जेनिलिया म्हणाली होती. तसेच रितेश देशमुखही जिनिलियाला पाणीपुरी आवडते असं म्हणाला होता. तसेच लातूरला गेल्यावर ती ठेचा, भाकरी, पिठलं-भाकरी, शेंगदाण्याची चटणी, काळ्या मसाल्याची आमची या पदार्थांवर ताव मारते असंही रितेश म्हणाला होता. रितेश-जिनिलियाच्या आगामी सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (photo:geneliad/ig)
Published at : 03 Apr 2024 04:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
सांगली
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
