एक्स्प्लोर

Siddharth Jadhav Marathi Play Animal: सिद्धार्थ जाधवचं आठ वर्षांनी रंगमंचावर दणक्यात पुनरागमन; 'ॲनिमल'मध्ये साकारणार दुहेरी भूमिका

Siddharth Jadhav Marathi Play Animal: 'ॲनिमल' हे नाटक महेश मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित असून सिद्धार्थ जाधव या प्रयोगात दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे, सिद्धार्थ जाधव या नाटकाचा निर्माताही आहे.

Siddharth Jadhav Marathi Play Animal: मराठी रंगभूमीवर (Marathi Theatre) नव्या नाटकांची चाहूल लागलेली असतानाच 'ॲनिमल' (Marathi Play Animal) या नाटकानं आणखी एक वेगळी चर्चा रंगवली आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आठ वर्षांनंतर रंगमंचावर पुनरागमन करत असून या वेळी त्यांचा प्रवास केवळ एका प्रयोगापुरता मर्यादित नसून सलग प्रयोगांच्या मालिकेतून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. ठाणे, बोरीवली, वाशी, दादर, पार्ले आणि मुलुंड अशा विविध नाट्यगृहांमध्ये 'ॲनिमल'चे सलग प्रयोग सादर होणार असल्यानं या नाटकाकडे रंगभूमीप्रेमींचं विशेष लक्ष लागलं आहे.

'ॲनिमल' हे नाटक महेश मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित असून सिद्धार्थ जाधव या प्रयोगात दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे, सिद्धार्थ जाधव या नाटकाचा निर्माताही आहे. आई-वडिलांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या 'ताराराम' या निर्मिती संस्थेची ही पहिली निर्मिती असून, या नाटकातून त्या संस्थेचा रंगभूमीवरील प्रवास सुरू होत आहे.

'ॲनिमल' नाटकाची कथा नेमकी काय? 

नाटकाची कथा दत्तू या तरुणाभोवती फिरते. छोट्या गावातून मुंबईत आलेला हा तरुण अभिनेता होण्याचं स्वप्न पाहतो. मात्र शहरातील स्पर्धा, अस्थिरता, नात्यांमधील अंतर आणि मानसिक ताण यांच्या घुसमटीत त्याचा प्रवास अधिक गुंतागुंतीचा होत जातो. एका व्यक्तीच्या मनात चालणारी ही झुंज रंगमंचावर एकपात्री शैलीत साकारली जाणार आहे.

सिद्धार्थ जाधव साठीही हा प्रयोग विशेष ठरणार आहे. नाटकाबाबत बोलताना सिद्धार्थ म्हणाला की, "हे नाटक मला कलाकार म्हणून नव्यानं तपासतं. प्रत्येक प्रयोगासोबत हा प्रवास अधिक खोल होत जातो. सलग वेगवेगळ्या रंगमंचांवर प्रेक्षकांसमोर उभं राहणं म्हणजे, प्रत्येक वेळी नवा अनुभव जगण्यासारखं आहे..." 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Animal Marathi Natak (@animal.marathinatak)

सध्या 'ॲनिमल'च्या तालमी जोरात सुरू असून येत्या काही दिवसांत ठाण्याच्या गडकरी रंगायतनपासून या प्रयोगांची सुरुवात होणार आहे. त्यानंतर बोरीवली, वाशी, दादर, पार्ले आणि मुलुंड येथे सलग प्रयोग रंगणार आहेत. स्वतः महेश मांजरेकर यांनी या नाटकाला संगीत दिलं असून, एकपात्री मांडणी आणि सिद्धार्थ जाधव यांचे रंगमंचावरील पुनरागमन यामुळे 'ॲनिमल'च्या या प्रयोगमालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Dhurandhar 2 Vivek Sinha Reacts On Getting Hate: 'हिंदू बहुत डरपोक कौम है…', 'धुरंधर 2'च्या डायलॉगवर भडकले प्रेक्षक, अभिनेत्याला जीवेमारण्याच्या धमक्या; जीव तोडून सांगतोय, 'अरे मी हिंदू...'

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget