एक्स्प्लोर
Dharmaveer 2 : धर्मवीर 2 च्या शूटींगला सुरुवात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला मुहूर्त सोहळा
Dharmaveer 2 : 'धर्मवीर 2' या सिनेमाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरुवात झाली आहे.
Dharmaveer 2
1/9

धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि तुफान गाजला.
2/9

आता लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
3/9

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या सिनेमाच्या शुटिंगला आजपासून सुरुवात झाली आहे.
4/9

सुरत, गुवाहाटी ते मंत्रालय एकनाथ शिंदेंच्या उठावाची थरारक कहाणी या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
5/9

या सिनेमाच्या शुभारंभादरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले की,"धर्मवीर 2' या सिनेमात मी मुख्यमंत्री म्हणून दिसणार आहे".
6/9

एकनाथ शिंदे 'धर्मवीर 2' या सिनेमात मुख्यमंत्री म्हणून दिसणार आहे. त्यामुळे शिंदेंच्या उठावाची कहाणी दुसऱ्या भागात उलगडणार का? असा प्रश्न उपस्थित होतो.
7/9

तसेच उद्धव ठाकरे यांचं पात्र असणार की वगळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
8/9

'धर्मवीर 2' सिनेमाची निर्मिती करण्यात येणार असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे निभावणार आहेत.
9/9

अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) दिघे साहेबांची भूमिका साकारणार असून अन्य कलाकरांची नावे मात्र गुलदसत्यात ठेवण्यात आली आहे.
Published at : 27 Nov 2023 04:04 PM (IST)
आणखी पाहा























