एक्स्प्लोर
Urfi Javed Photo : उर्फी जावेदवर मुंबई पोलिसांची कारवाई, व्हायरल व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल
Mumbai Police Action On Urfi Javed : उर्फी जावेदच्या एका व्हिडीओवरून मुंबई पोलिसांनी तिच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai Police Action On Urfi Javed
1/8

आपल्या चित्रविचित्र कपड्यांमुळे सातत्याने चर्चेत असलेली अभिनेत्री उर्फी जावेद आता आणखी एका प्रकरणामुळे चर्चेत आली आहे.
2/8

मुंबई पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे, तसेच तिच्या एका सहकाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे.
3/8

उर्फी जावेदच्या एका व्हिडीओवरून मुंबई पोलिसांनी ही कारवाई करत तिच्या विरोधात भा.दं.वि कलम 171, 419, 500, 34 प्रमाणे हा गुन्हा दाखल केला आहे.
4/8

उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये तिच्या तोकड्या कपड्यांमुळे पोलिसांनी तिला अटक केल्याचं दिसत आहे.
5/8

स्वस्त प्रसिद्धीसाठी कुणीही कायद्याचं उल्लंघन करू शकत नाही, संबंधित पोलिसांचे सन्मानचिन्ह आणि गणवेशाचा गैरवापर करण्यात आला आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे.
6/8

तो व्हिडिओ लोकांना खरा वाटला त्यामुळे संपूर्ण देशात व जगात महिलांनी अपुरे कपडे घालण्यास मुंबई पोलीस हे अटक करतात असा संदेश गेल्यामुळे मुंबई पोलिसांची बदनामी झाली.
7/8

त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्या व्हिडीओतील तोतया पोलीस निरीक्षकाला अटक केली, तसेच त्यामध्ये वापरण्यात आलेले वाहन जप्त केलं.
8/8

पोलिसांचा गणवेश वापरून उर्फी जावेदन स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मुंबई पोलिसांची बदनामी केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
Published at : 03 Nov 2023 10:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
