कंगना रनौतने 'धाकड' चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. या चित्रपटात ती अॅक्शन करताना दिसून येईल. हा बॉलिवूडचा पहिला महिला अॅक्शन चित्रपट असेल.
2/9
बॉलिवूडची अभिनेत्री विद्या बालन सध्या मध्यप्रदेशमध्ये 'शेरनी' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. ती तिथल्या काही जंगलांमध्ये मागच्या काही आठवड्यांपासून या चित्रपटाचे शूटिंग करत आहे.
3/9
तापसी पन्नू भारतीय महिला क्रिकेटर मिथाली राजच्या बायोपिकमध्ये दिसून येणार आहे. नुकताच तिने मिथाली राजच्या लूकमधला फोटो शेअर केला आहे.
4/9
बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौत सध्या 'तेजस' या चित्रपटाची शूटिंग करत आहे. या चित्रपटात एका महिला सैनिक अधिकारीची गोष्ट आहे.
5/9
'रश्मी रॉकेट' या चित्रपटात तापसी पन्नू एका अॅथलेटिकची भूमिका साकारत आहे. ही एका अशा मुलीची गोष्ट आहे जीचा प्रवास राजस्थानच्या एका छोट्या गावापासून सुरू होतो आणि नॅशनल लेव्हलच्या अॅथलेटिकपर्यंत जाऊन पोहोचतो.
6/9
यानंतर प्रदर्शित होणारा चित्रपट 'गंगूबाई काठीयावाडी' आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. ही एका गंगूबाई पात्राच्या लाल लाईटपासून राजकरणापर्यंतची गोष्ट आहे. याचे दिग्दर्शन संजय लिला भन्साळी यांनी केले आहे.
7/9
'सायना' या चित्रपटात परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. परिणीती भारतीय बॅटमिंटनपटू सायना नेहवालची भूमिका साकारत आहे. हा देखील बायोपिकच असणार आहे.
8/9
पहिला नंबर कंगना रनौतच्या 'थलाइवी' या चित्रपटाने लावलेला आहे. हा चित्रपट पुढच्याच महिन्यात प्रदर्शित होईल. हा चित्रपट तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा बायोपिक आहे. यामध्ये कंगना रनौत जयललितांची भूमिका साकारत आहे.
9/9
2021 हे वर्ष महिला अभिनेत्रींसाठी खूपच खास ठरणार आहे. या वर्षात केंद्रस्थानी महिला असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. महिला दिनानिमित्ताने आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांविषयी माहिती देणार आहोत.