एक्स्प्लोर
Stree 2 Who Is Sarkata : धडकी भरवणारा 'स्त्री 2' मधील 'सरकटा' आहे तरी कोण? रियल लाईफमध्ये म्हणतात पोलीस दलातील 'खली'; पाहा फोटो
Stree 2 Who Is Sarkata : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा चित्रपट 'स्त्री 2' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'सरकटा' यांची दहशत या चित्रपटात आहे. जाणून घेऊया 'सरकटा' खऱ्या आयुष्यात कसा दिसतो
'स्त्री 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हॉरर कॉमेडीपटातील सरकटाने चांगलीच दहशत माजवली आहे. स्त्री 2 ची भुरळ प्रेक्षकांवर पडली आहे. उंच धिप्पाड असलेल्या सरकटा भुताची भूमिका कोणी साकारलीय, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.
1/8

'स्त्री 2' ची क्रेझ देशात आणि जगात मोठ्या प्रमाणात आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. हा हॉरर कॉमेडी चित्रपट 2024 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या 6 दिवसांत 250 कोटींचा आकडा पार केला आहे.
2/8

'स्त्री 2'मध्ये 'सरकता'ची भूमिका साकारून श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांना अडचणीत आणणाऱ्या अभिनेत्याचे नाव सुनील कुमार आहे.
3/8

बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटात मनात भितीची धडकी भरवणाऱ्या 'सरकटा'ची भूमिका कोणी साकारली, जोरदार चर्चा सुरू आहे. हा सरकटा वास्तविकपणे कसा दिसतो, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
4/8

सुनील कुमार हा 7 फूट 6 इंच इतका उंच आहे. बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, सुनील जम्मू-काश्मीर पोलीस दलात हवालदार आहे. सुनीलला त्याच्या उंचीमुळे 'जम्मूचा ग्रेट खली' देखील म्हटले जाते.
5/8

वृ्त्तानुसार, 'स्त्री 2'चे दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले की, चित्रपटासाठी खूप उंच असलेल्या व्यक्तीची गरज होती आणि कास्टिंग टीमला सुनील सापडला.
6/8

अमर कौशिक यांनी असेही सांगितले की, सरकटाचे पात्र सीजीआय वापरून तयार करण्यात आले आहे. आणि मग सुनील कुमारने ही भूमिका केली पण त्याचा भितीदायक चेहरा सीजीआयने तयार करण्यात आला.
7/8

'स्त्री 2' मध्ये सरकटा ही भूमिका साकारून प्रसिद्ध झालेला सुनील कुमार कुस्तीपटू असून हँडबॉल आणि व्हॉलीबॉलचा खेळाडूही आहे. 2019 मध्ये सुनीलने WWE ट्रायआउट्समध्ये भाग घेतला होता.
8/8

सुनील कुमारच्या इन्स्टा प्रोफाइलवर एक फोटो आहे. तो ब्लॉकबस्टर 'कल्की एडी 2898' मध्ये अमिताभ बच्चनचा बॉडी डबल बनला आहे. या चित्रपटात अमिताभ यांनी अश्वत्थामाची भूमिका साकारली होती.
Published at : 22 Aug 2024 11:14 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
क्राईम
पुणे
























