एक्स्प्लोर
Bollywood Actress : 'किंग खान'च्या चित्रपटात झळकली, राष्ट्रीय पुरस्कार मिळाला; सिनेइंडस्ट्री सोडून झालीय हेअर स्टायलिश
शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या चक दे इंडिया या चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी काम केले होते. त्यातील एका अभिनेत्रीने आपल्या करिअरमधील सर्वाधिक चांगल्या काळात इंडस्ट्रीला रामराम केला.
शाहरुख खानचा 'चक दे इंडिया' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. एका ब्रेकनंतर शाहरुख खानने या चित्रपटातून कमबॅक केले होते. या चित्रपटात शाहरुख खानसोबत इतरही काही नवोदित अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. स्पोर्टस ड्रामा असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली होती. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. या चित्रपटातील एका अभिनेत्रीने सिनेइंडस्ट्रीतील कारकिर्दीला निरोप देत नवीन क्षेत्रात पदार्पण केले.
1/8

'चक दे इंडिया'मध्ये झळकलेली अनायता नायर या अभिनेत्रीने आलिया बोस या हॉकीपटूची व्यक्तीरेखा साकारली होती.
2/8

अनायता बोसचा जन्म 19 जुलै 1984 रोजी कर्नाटकमधील बेंगळुरूमध्ये झाला. चक दे इंडियाच्या यशानंतर अनायताला काही चित्रपटांच्या ऑफर आलेल्या. तिने मुंबई कॉलिंग, दम मारो दम, फोर्स या चित्रपटातही काम केले. तिने मल्याळम भाषेतील 'बॉय द पीपल' आणि 'आयजी' यासारख्या चित्रपटात काम केले.
3/8

2010 मध्ये अनायताच्या 'वेल डन अब्बा' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याने बोमन इराणी आणि मिनिषा लांबासोबत स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाला सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तथापि, या यशानंतरही 2011 मध्ये रिलीज झालेला 'फोर्स' हा तिचा शेवटचा चित्रपट होता. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा अनायता ही अवघ्या 27 वर्षांची होती.
4/8

2011 मध्ये अनायताने अखिल नायर सोबत लग्नगाठ बांधली.
5/8

या दाम्पत्याला एक मुलगी असून अनायता ही आपलं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे. तिने आता दुसऱ्या क्षेत्रात आपली नवी इनिंग सुरू केली आहे.
6/8

अनायता ही सध्या एक हेअर स्टायलिश असून हाँगकाँगमध्ये एक सलून चालवत आहे.
7/8

काही वर्षांपूर्वी एका वृत्तात तिला हाँगकाँगची 'बेस्ट हेअर स्टायलिश' असल्याचे नमूद करण्यात आले होते. अनायताचे सलून 'हेअर बाय अनायथा' हे हाँगकाँगमध्ये प्रसिद्ध आहे.
8/8

एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अनायताने दशकभरापूर्वी तिचा व्यवसाय सुरू करताना तिच्या स्ट्रगलचाही उल्लेख केला होता. सुरुवातीला स्ट्रगल केल्यानंतर आता त्या मेहनतीनंतर आपलं सलून हाँगकाँगमधील सर्वोत्कृष्ट सलून असल्याचे सांगण्यात आले.
Published at : 22 Jul 2024 11:34 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement



















