एक्स्प्लोर
In Pics : 'रंगवा तुमचा कागदी बाप्पा' उपक्रमात राहुल देशपांडे कुटुंबीयांसोबत झाला सहभागी
Rahul Deshpande : 'रंगवा तुमचा कागदी बाप्पा' या उपक्रमात राहुल देशपांडे कुटुंबीयांसोबत सहभागी झाला होता.
Rahul Deshpande
1/10

पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 'रंगवा तुमचा कागदी बाप्पा' हा इको-फ्रेंडली गणेशोत्सवासाठी विशेष असा उपक्रम हाती घेण्यात आला.
2/10

गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हे या उपक्रमाचे मूळ उद्दिष्ट आहे.
3/10

राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आपल्या कुटुंबीयांसोबत म्हणजेच पत्नी नेहा आणि मुलगी रेणुका समवेत बाप्पाची कागदी मूर्ती रंगवून सहभागी झाले.
4/10

उपक्रमांतर्गत रंगविण्यात येणाऱ्या इको-फ्रेंडली गणेशमूर्ती अनोख्या असून, त्या 80% कापूस-कागदाचा लगदा आणि 20% शाडू माती अशा विशिष्ट मिश्रणापासून तयार केल्या जातात.
5/10

राहुल देशपांडे उपक्रमासंदर्भात म्हणाला,"पर्यावरणपूरक गणेश मूर्ती रंगविण्याचा हा उपक्रम माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे.अलीकडे पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत नागरिकांमध्ये बरीच जागरुकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे".
6/10

राहुल देशपांडे पुढे म्हणाला,"आजच्या पिढीमध्ये 'माझी पृथ्वी वाचविण्यासाठी माझ्या परीने शक्य ती गोष्ट करेन' ही भावना जागृत झाली आहे".
7/10

'रंगवा तुमचा कागदी बाप्पा' या उपक्रमात 600 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
8/10

येत्या काही दिवसात महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी देखील या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
9/10

'रंगवा तुमचा कागदी बाप्पा' या उपक्रमात गायक राहुल देशपांडेने सहकुटुंब पर्यावरणपूरक गणेशमूर्ती रंगवली.
10/10

'रंगवा तुमचा कागदी बाप्पा' या उपक्रमातील बाप्पाची कागदी मूर्ती रंगवतानाचे राहुल देशपांडेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Published at : 23 Aug 2022 09:02 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
पुणे


















