एक्स्प्लोर
Om Puri Birth Anniversary : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते Om Puri यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या गाजलेल्या सिनेमांबद्दल
ओम पुरी
1/7

ओम पुरींचा (Om Puri)जन्म 18 ऑक्टोबर 1950 साली झाला होता. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी कमी वयात चहाच्या टपरीवर काम करायला सुरुवात केली. काम करत असतानाच त्यांनी शिक्षण देखील पूर्ण केले. ओम पुरींना अभिनयात आवड असल्याने त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि फिल्म अॅन्ड टेलीव्हीजन इंस्टीट्यूट ऑफ इंडियामधून अभिनयातील उच्च शिक्षण घेतले. त्यांनी अभिनयाची सुरुवात 1976 साली मराठी चित्रपट 'घाशीराम कोतवाल' पासून केली.
2/7

अर्ध सत्य (Ardh Satya) - 1983 साली प्रदर्शित झालेल्या 'अर्ध सत्य' चित्रपटात ओम पुरींनी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका स्वीकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद निहलानी यांनी केले होते. तर अमरीश पुरी, स्मिता पाटील आणि नसीरुद्दीन शाह अशा बड्या कलाकारांचा चित्रपटात समावेश होता. अर्ध सत्य चित्रपटासाठी ओम पुरींना नॅशनल अवॉर्डदेखील मिळाला होता.
3/7

जाने भी दो यारो (Jaane Bhi Do Yaaron) - 'जाने भी दो यारो' हा सिनेमा 1983 साली प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा समाजातील काही घटकांत होणाऱ्या भ्रष्टाचारावर आधारित आहे. नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, सतीश शाह,सतीश कौशिक आणि नीना गुप्ता यांच्या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. चित्रपटात ओम पुरींनी एका बिल्डरची भूमिका स्विकारली आहे.
4/7

आरोहण (Arohan) - 1982 साली प्रदर्शित झालेला आरोहण सिनेमा श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात ओम पुरींना बंगालमधील एका खेडेगावात राहणाऱ्या एका गरीब शेतकऱ्याची भूमिका स्विकारली होती.
5/7

सद्गति (Sadgati) - सत्यजीत रे यांनी खास छोटा पडद्यासाठी बनवलेला 'सद्गति' हा पहिलाच सिनेमा आहे. हा सिनेमा 1981 साली प्रदर्शित करण्यात आला होता. ओम पुरीने चित्रपटात गावातील गरीब ठेकेदाराची भूमिका स्विकारली होती.
6/7

मिर्च मसाला (Mirch Masala) - 1987 साली प्रदर्शित झालेला 'मिर्च मसाला' केतन मेहतांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, ओम पुरी आणि स्मिता पाटीलसारख्या बड्या कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटातील ओम पुरींच्या कामाचे कौतुक होत होते.
7/7

आक्रोश (Aakrosh) - गोविंद निहलानी यांनी दिग्दर्शित केलेला 'आक्रोश' हा पहिलाच सिनेमा होता. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटासाठी नॅशनल अॅवॉर्ड मिळाला होता. चित्रपटाचे कथानक नगरपालिकेतील भ्रष्टाचारावर आधारित आहे.
Published at : 18 Oct 2021 07:02 PM (IST)
आणखी पाहा























