एक्स्प्लोर
PHOTO : मैत्रिणींच्या सांगण्यावरून लिसा हेडन मॉडेलिंगकडे वळली, परदेशातून भारतात येऊन बॉलिवूडमध्ये रमली!

Lisa Haydon
1/6

मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन (Lisa Haydon) आज तिचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे. लिसाचा जन्म 17 जून 1986 रोजी चेन्नईमध्ये झाला. तिचे वडील वडील भारतीय, तर आई अॅना हेडन मूळची ऑस्ट्रेलियन आहे.
2/6

लिसाचे खरे नाव एलिझाबेथ मेरी हेडन आहे. बालपणापासून लिसाला योगा टीचर व्हायचे होते. पण, मित्र परिवाराच्या सांगण्यावरून तिने मॉडेलिंगवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली.
3/6

आई ऑस्ट्रेलियन असल्याने लिसाने आयुष्याची पहिली वर्षे त्यांनी परदेशात घालवली. लिसाला लहानपणापासून योगाची आवड आहे. तिने मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि नंतर पॉकेटमनीसाठी ऑस्ट्रेलियात मॉडेलिंग सुरू केले.
4/6

बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी ती 2007मध्ये भारतात आली होती. भारतात आल्यानंतर ती अनेक नामांकित ब्रँडच्या जाहिरातींमध्ये दिसली. अभिनयापूर्वी लिसा जाहिरात विश्वात खूप प्रसिद्ध होती.
5/6

भारतात तिची पहिली जाहिरात Hyundai i20 कारची होती, तर ऑस्ट्रेलियात तिने एका स्ट्रेच मार्क क्रीमची पहिली जाहिरात केली होती.
6/6

यादरम्यान ती अनेक फॅशन मॅगझिनच्या कव्हर पेजवरही दिसली. लिसा ही किंगफिशर गर्लही बनली होती. लिसा हेडनने 2011 मध्ये विजय मल्ल्याच्या किंगफिशर कॅलेंडरसाठी फोटोशूट देखील केले आहे. अनिल कपूरने लिसाला एका कॉफी शॉपमध्ये पाहिले आणि 'आयशा' चित्रपटासाठी तिला साईन केले. या चित्रपटाद्वारे तिची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. (Photo : @ lisahaydon/IG)
Published at : 17 Jun 2022 10:39 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
