एक्स्प्लोर
Vicky Katrina Wedding Anniversary : जेव्हा विकी कतरिनाच्या प्रेमात पडला... अशी आहे दोघांची लव्हस्टोरी
Katrina Vicky Wedding : अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे.

Katrina Vicky Wedding Anniversary
1/12

अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) 9 डिसेंबर 2021 मध्ये विवाहबंधनात अडकले. आज या रोमॅंटिक कपलच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे.
2/12

कतरिना आणि विकी याचं लग्नसोहळा (Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding) राजस्थानमध्ये फार धूमधडाक्यात पार पडला. मोजके पाहुणे आणि कुटुंबियांच्या साक्षीने दोघांनी लग्नगाठ बांधली.
3/12

दिग्दर्शिका झोया अख्तरच्या एका पार्टीमध्ये कतरिना आणि विकीची पहिला भेट झाली. दोघे कधीही एकत्र पडद्यावर झळकले नाही, पण यांची नेमकी लव्हस्टोरी कशी आहे, जाणून घ्या.
4/12

याची सुरुवात करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोपासून झाली. 2019 च्या एका एपिसोडमध्ये, करणने कतरिनाला विचारले की तिला कोणासोबत काम करायला आवडेल. या प्रश्नावर कतरिना कैफने विकी कौशलचे नाव घेतलं होतं. दोघे एकत्र छान दिसतील, असं कतरिनाने म्हटलं.
5/12

यानंतर जेव्हा विकी कौशल जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅटशोमध्ये आयुष्मान खुरानासोबत पोहोचला तेव्हा करणने कतरिना जे म्हणाली होती ते विकीला सांगितलं.
6/12

कतरिनाने आपलं नाव घेतलं हे ऐकून विकी खूप खुश झाला. त्यानंतर दोघे पहिल्यांदाच फिल्म कम्पॅनियन टेप कास्टच्या एपिसोडसाठी एकत्र दिसले.
7/12

फिल्म कम्पॅनियन टेप कास्टच्या एपिसोडदरम्यान, त्यांनी एकमेकांना त्यांचे कुटुंब, मित्र आणि फिल्म इंडस्ट्रीतील कामाच्या अनुभवाबद्दल प्रश्न विचारले. यानंतर त्यांची हळूहळू मैत्री आणि नंतर त्याचं रुपांतर प्रेमात झालं.
8/12

विकी कौशल आणि कतरिना कैफचं लग्न त्यांच्या चाहत्यांसाठी एखाद्या सरप्राईझपेक्षा कमी नव्हतं.
9/12

मीडीया रिपोर्टनुसार, हे दोघे एकमेकांना फार आधीपासूनच डेट करत होते पण त्यांनी अधिकृतरित्या त्यांच्या नात्याची कबूली दिली नव्हती.
10/12

कतरिना आणि विकीचं लग्नही खूप खाजगी पद्धतीनं झालं. राजस्थानमधील सिक्स सेंस फोर्ट भरवाडा येथे या दोघांचा विवाह पार पडला.
11/12

लग्नसमारंभात कतरिना कैफचा राजेशाही थाट पाहायला मिळाला होता. लाल लेहेंगा चोली, मांग टिका, हेवी ज्वेलरी, हातामध्ये कलिरे असा कतरिनाचा साज होता.
12/12

कतरिना आणि विकीचा लग्नसोहळा पार पडल्यानंतर दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांच्या नात्याची कबुली दिली. दोघांनी लग्नातील शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला होता.
Published at : 09 Dec 2022 01:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
