बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोशल मीडियावरचा तिचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. तिचे चाहते तिच्या पोस्टची वाट बघत असतात. कतरिना कैफने नुकतेच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे फोटो शेअर केले आहेत.
2/5
लाल रंगाच्या लेहंग्यात कतरिना खूपच सुंदर दिसून येत आहे. कतरिना कधीच तिच्या चाहत्यांना नाराज करत नाही. सध्या कतरिनाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहेत.
3/5
कतरिनाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सूर्यवंशीच्या प्रवासासाठी आशीर्वाद मागितला आहे.
4/5
कतरिनाने लाइट मेकअप केला आहे. मोकळ्या केसांनी कतरिनाचा लूक पूर्ण केला आहे. फोटोसाठी बॅकग्राउंडदेखील साधेच ठेवण्यात आले आहे. या फोटोला आतापर्यंत 15 लाखापेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
5/5
कतरिना लवकरच अक्षय कुमारच्या सूर्यवंशी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच कतरिनाचा 'फोन भूत' सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसेच कतरिना लवकरच सलमान खानच्या 'टाइगर 3' चित्रपटात दिसून येणार आहे.