एक्स्प्लोर
Bollywood Love Story : दिलीप कुमारना मधुबालाचं अंत्यदर्शनही घेता आलं नाही, नेमकं काय घडलं; जाणून घ्या रंजक प्रेमकहाणी
Bollywood Love Story : अंत्यसंस्काराला पोहोचल्यानंतरही अभिनेते दिलीप कुमार यांना मधुबालाचा चेहरा पाहता आला नव्हता.
Madhubala Dilip Kumar Love Story
1/11

मधुबाला ही हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक होती आणि तिच्या सुंदरतेची चर्चा आजही होते.
2/11

मधुबालाच्या निधनाने केवळ चाहतेच नाही तर अनेक अभिनेतेही दु:खी झाले होते. मधुबालाच्या आयुष्यातील एक रंजक गोष्ट जाणून घ्या.
3/11

मधुबालाने बॉलिवूडला अनेक अविस्मरणीय चित्रपट दिले आहेत. यादरम्यान केवळ चाहतेच नाही तर अनेक अभिनेत्यांच्याही ह्रदयावर मधुबाला राज्य करत होती.
4/11

मधुबालाने बॉलिवूडला अनेक अविस्मरणीय चित्रपट दिले आहेत. यादरम्यान केवळ चाहतेच नाही तर अनेक अभिनेत्यांच्याही ह्रदयावर मधुबाला राज्य करत होती.
5/11

या अभिनेत्यांपैकी एक नाव ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचेही होते. त्यांनी एकेकाळी अभिनेत्री मधुबालावर खूप प्रेम केलं. आजही त्यांच्या प्रेमाच्या चर्चा बॉलिवूडमध्ये ऐकायला मिळतात.
6/11

दिलीप कुमार आणि मधुबाला 9 वर्षे एकमेकांना डेट करत होते. पण नंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि जोडपे वेगळे झाले. दोघांची एंगेजमेंटही झाली होती, पण हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही, असं सांगितलं जातं.
7/11

दिलीप आणि मधुबालाचे नाते तुटण्यामागे अभिनेत्रीचे वडील कारण असल्याचं सांगितलं जात आहे. मधुबालाच्या वडीलांना दिलीपकुमारला अजिबात आवडत नव्हते. दिलीपपासून वेगळे झाल्यानंतर मधुबालाने गायक आणि अभिनेते किशोर कुमार यांच्याशी लग्न केले. पण, हे नातंही फार काळ टिकलं नाही.
8/11

लग्नानंतर मधुबालाच्या हृदयात छिद्र असल्याचे आढळून आलं. या आजारामुळे मधुबालाचा हळूहळू अंथरूणाला खिळली. किशोर कुमार यांनी लंडनमध्ये मधुबालाच्या उपचारासाठी खूप पैसे खर्च केले पण, ती बरी होऊ शकली नाही आणि त्यानंतर 1969 मध्ये मधुबालाने जगाचा निरोप घेतला.
9/11

अभिनेत्री मधुबालाच्या निधनाने किशोर कुमार पूर्णपणे खचून गेले होते. यामुळे दिलीप कुमाय यांनाही मोठा धक्का बसला.
10/11

मधुबालाच्या मृत्यूची बातमी मिळताच त्यांनी तिला शेवटचे पाहण्यासाठी स्मशानाकडे धाव घेतली. पण जेव्हा दिलीप कुमारे तेथे पोहोचला तेव्हा खूप उशीर झाला होता. तोपर्यंत मधुबालावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
11/11

दिलीप कुमार आणि मधुबाला यांचा चित्रपट 'मुघल-ए-आझम' अजूनही सिनेप्रेमींच्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत समाविष्ट आहे.
Published at : 27 Jul 2023 06:24 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
महाराष्ट्र
























