निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा कॉफी विथ करण हा शो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. या शोमध्ये करीना कपूरने अनेक कलाकारांबद्दल वेगवेगळी विधानं केली आहेत जी अनेकांसाठी धक्कादायक होती. करीनाच्या या विधानांना अनेक कलाकारांनी प्रत्युत्तरही दिलं आहे.
2/5
करीनाने या शोमध्ये जॉन अब्राहमला एक्सप्रेशनलेस असं म्हटलं होतं. त्यावेळी जॉनसोबत अफेअर असलेल्या बिपाशाने करीनाला उत्तर देताना सांगितलं होतं की 'जॉन हा अनेक एक्सप्रेशन देतो.'
3/5
अभिनेत्री प्रियांका चोप्राला करण जोहरने विचारलं होतं की जर तिला करीनाच्या कम्प्युटरमध्ये चोरी करायची असेल तर ती काय चोरी करेल, त्यावर प्रियांका म्हणाली होती की, 'करीनाकडे कम्प्युटर आहे का?'
4/5
अभिनेत्री प्रिती झिंटा करीनाविषयी बोलताना म्हणाली की, "मला करीनाशी कोणताही प्रॉब्लेम नाही, पण जर ती मला इग्नोर करत असेल तर मात्र मला ते आवडत नाही."
5/5
बॉलिवूडचे अनेक चित्रपट करीनाने नाकारले आणि ते दीपिकाला मिळाले होते. या संधीचं सोनं करत दीपिका आज टॉपवर पोहोचली आहे. करणने यावर करीनाला काय सूचना करशील असं दीपिकाला विचारलं होतं. त्यावर दीपिकाने उत्तर दिलं, 'चॅरिटी.'