अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. नुकताच तिचा 'थलाईवी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. (Photo : @kanganaranaut/IG)
2/8
कंगना रनौतचा 'थलाईवी' हा चित्रपट तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.(Photo : @kanganaranaut/IG)
3/8
एका एफएम रेडिओवर दिलेल्या मुलाखतीमध्ये कंगनाने आपल्या राजकारणातील प्रवेशावर भाष्य केलं आहे. (Photo : @kanganaranaut/IG)
4/8
आपण देशभक्त आहे पण राजकारणात लगेच प्रवेश करण्याची आपली कोणतीही योजना नसल्याचं कंननाने म्हटलं आहे. (Photo : @kanganaranaut/IG)
5/8
राजकारणात येण्यासाठी ग्राऊंड लेव्हलवर काहीतरी काम केलं पाहिजे असं कंगना म्हणाली. (Photo : @kanganaranaut/IG)
6/8
पण लोकांची इच्छा असेल तर आपण राजकारणात यायचा नक्कीच विचार करु असंही कंगनाने स्पष्ट केलं आहे.(Photo : @kanganaranaut/IG)
7/8
आपण देशभक्त असून देशभक्तीवर बोलल्याने आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागली असल्याचं कंगना रनौत म्हणाली. (Photo : @kanganaranaut/IG)
8/8
असं असलं तरी माझ्यासाठी पैशापेक्षाही देश मोठा आहे असंही कगनाने स्पष्ट केलं. (Photo : @kanganaranaut/IG)