एक्स्प्लोर
Amruta Khanvilkar : यंदाचा गणेशोत्सव होणार अधिकच भक्तिमय; अमृता खानविलकरचा पहिलंवहिलं गाणं 'गणराज गजानन' प्रेक्षकांच्या भेटीला
Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर निर्मित 'गणराज गजानन' हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
Amruta Khanvilkar
1/10

आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने आणि नृत्य अदाकारीने सर्वांना घायाळ घालणाऱ्या अमृता खानविलकरने गणेशोत्सवानिमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी एक भेट आणली आहे.
2/10

अमृता खानविलकर निर्मित 'गणराज गजानन' हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
3/10

'गणराज गजानन' या गाण्याच्या माध्यमातून अमृता खानविलकरने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
4/10

अमृताने निर्मिती केलेल्या या पहिल्यावहिल्या गाण्याचे नाव 'गणराज गजानन' असे असून गणेशाला वंदन करणाऱ्या या आल्हाददायी गाण्याला राहुल देशपांडे यांचा सुमधुर आवाज आणि संगीत लाभले आहे तर या गायला समीर सावंत यांनी शब्दबद्ध केले आहे.
5/10

अमृता खानविलकरच्या बहारदार नृत्याने या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे.
6/10

काही दिवसांपूर्वी अमृता खानविलकरने 'गणराज गजानन' या अल्बमबद्दल सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनंतर सर्वांनाच या गाण्याविषयी उत्सुकता लागली होती.
7/10

अमृताचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने यंदाचा गणेशोत्सव आता अधिकच भक्तिमय होणार आहे.
8/10

आपल्या या नवीन गाण्याविषयी अमृता खानविलकर म्हणते,''बाप्पाच्या गाण्याच्या निमित्ताने मी माझे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. बाप्पाची मूर्ती ज्या प्रमाणे हळूहळू आकार घेते, तशीच अतिशय श्रद्धेने ही कलाकृती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
9/10

अमृता पुढे म्हणाली,"मन तल्लीन करणारे हे गाणे असून 'गणराज गजानन'सोबत जोडल्या गेलेल्या प्रत्येकाने अतिशय मन लावून या गाण्याची अर्थात 'गणरायाची' सेवा केली आहे".
10/10

अमृताच्या या पहिल्या गाण्याला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
Published at : 12 Sep 2023 04:06 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















