एक्स्प्लोर
छोट्या पडद्यावर शेवंता म्हणून प्रसिद्ध असलेल्या अपूर्वा नेमळेकर झाली ट्रोल; काय आहे कारण?
छोट्या पडद्यावर कायम चर्चेत असलेला बिग बॉस मराठी या रिएल्टी शोची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. यंदा बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व असणार आहे.
apurva nemlekar
1/10

सोशल मीडियावर आपल्या प्रोजेक्टसह अनेकदा कलाकार आपली मते व्यक्त करत असतात. कलाकारांनी त्यांनी व्यक्त केलेल्या मतांवरून अनेकदा त्यांना ट्रोल केले जाते. नेटकरीदेखील बिनदास्तपणे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात.
2/10

छोट्या पडद्यावर शेवंता म्हणून प्रसिद्ध असलेल्या अपूर्वा नेमळेकरच्या ( Apurva Nemlekar) एका कमेंटवरून धुरळा उडाला आहे.
3/10

छोट्या पडद्यावर कायम चर्चेत असलेला बिग बॉस मराठी या रिएल्टी शोची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. यंदा बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व असणार आहे.
4/10

या सीझनचा होस्ट रितेश देशमुख (Riteish Deshmukh) असणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये बिग बॉस मराठीच्या या सीझनबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
5/10

या आधीच्या पर्वातील बिग बॉसमधील स्पर्धक अपूर्वा नेमळेकरच्या कमेंटवरुन धुरळा उडाला आहे.
6/10

आपल्या सौंदर्याने आणि अदांनी छोटा पडद्यावरील मालिका गाजवणाऱ्या अपूर्वाने बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये डावपेच, परफॉर्मेन्सने बिग बॉसच्या घरात आपली छापली सोडली होती. या चौथ्या सीझनमध्ये अपूर्वा नेमळेकरने टॉप 2 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले होते.
7/10

अपूर्वासोबत इतर स्पर्धकांचे झालेले वादही गाजले. आता अपूर्वाने बिग बॉस मराठीच्या नव्या होस्ट बाबत कमेंट करताना इन्स्टाग्रामवर स्टोरीतून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
8/10

कलर्स मराठीने आज बिग बॉस मराठीचा व्हिडीओ रिलीज केल्यानंतर अपूर्वाने कमेंट केली आहे. तिने आपल्या कमेंट्स मध्ये म्हटले की, फायनली... इसको बोलते है होस्ट.... रितेश सर वेलकम...
9/10

अपूर्वाने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये कलर्स मराठीने लाँच केलेला टीझर शेअर करत कॅप्शन देताना म्हटले की, अखेर महाराष्ट्रातील एका सर्वोत्तम घरासाठी एक सर्वोत्तम होस्ट मिळाला आहे.
10/10

तर, एका युजरने महेश मांजरेकरच चांगले होस्ट असल्याचे म्हटले. काही युजर्सने अपूर्वावर टीका केली. तुझ्यासारख्या स्पर्धकाचा महेश मांजरेकर यांनी माज उतरवला होता म्हणून का...? तर एकाने म्हटले की, तुझ्यासारख्या स्पर्धकाची वाट लावायला महेश मांजरेकरच हवे असेही एकाने म्हटले. महेश मांजरेकर यांनी तुमची मस्त वाट लावली होती असेही एकाने म्हटले.
Published at : 22 May 2024 04:18 PM (IST)
आणखी पाहा























