मनाविरुद्ध अशा चित्रपटांमध्ये काम करण्यापेक्षा अखेर सोनूनं कलाविश्वालाच रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला.
2/7
एका एनआरायशी तिनं लग्न केलं. पण, पतीच्या अकाली निधनामुळं पुढं तिनं दुसरं लग्न करत अमेरिकेतच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 1985मध्ये मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेचं जेतेपदही तिनं पटकावलं होतं. (सर्व छायाचित्रं- इन्स्टाग्राम)
3/7
सौंदर्य आणि अभिनयाच्या निकषांवर परिपूर्ण ठरणारी सोनू ही तिच्या उंचीमुळं या अडचणींचा सामना करत होती. सहसा उंची ही एखाद्या अभिनेत्रीसाठी वरदान ठरते. पण, सोनूसाठी मात्र हीच उंची अभिशाप ठरली होती.
4/7
तत्कालीन सुपरस्टार शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान या तिन्ही अभिनेत्यांपुढं ही अभिनेत्री अतिशय उंच ठरत होती.
5/7
परिणामी सोनूपेक्षा उंच असणाऱ्याच कलाकारांसमवेत तिची निवड केली जात होती. ज्यामुळं तिला अनेक बी- ग्रेड चित्रपटांमध्येही काम करावं लागलं होतं.
6/7
पहिल्याच चित्रपटात बोल्ड दृश्यामुळं ती प्रकाशझोतात आली होती. पण, त्यानंतर मात्र हा चेहरा अगदीच क्वचित दिसला.
7/7
रेखा आणि कबीर बेदी यांच्या ‘खून भरी मांग’ या चित्रपटातून हिंदी कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री सोनू वालियाला हिंदी कलाविश्वात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.