एक्स्प्लोर
Photo : अभिनेत्री Jacqueline Fernandez ईडीसमोर चौकशीसाठी हजर, काय आहे प्रकरण?
(Photo:@jacquelinef143/IG)
1/9

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) चं नाव गेल्या काही दिवसांपासून एक मनी लॉन्ड्रिंग केस (Mony Laundering Case) मध्ये चर्चेत आलं आहे. (Photo:@jacquelinef143/IG)
2/9

काही दिवसांपूर्वीच जॅकलीन फर्नांडिसच्या प्रवक्त्यांनी जारी केलेल्या अधिकृत वक्तव्यानुसार, जॅकलीनला ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. जॅकलीन चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचली होती, तसेच तिनं ईडीकडे आपला जबाबही नोंदवला आहे. (Photo:@jacquelinef143/IG)
3/9

तसेच जॅकलीनच्या जबाबामुळे भविष्यात ईडीला तपासात मदत होईल, असंही या वक्तव्यात सांगण्यात आलं आहे. (Photo:@jacquelinef143/IG)
4/9

दरम्यान, सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आता बॉलिवूड सेलिब्रिटीही ईडीच्या रडारवर आल्याचं दिसत आहे. (Photo:@jacquelinef143/IG)
5/9

या प्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससोबतच अभिनेत्री नोरा फतेहीलाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. (Photo:@jacquelinef143/IG)
6/9

या प्रकरणाबाबत बोलायचं झालं तर 200 कोटींच्या खंडणीपासून या प्रकरणाची सुरुवात झाली होती. तिहार जेलमध्ये बसलेल्या सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) यानं एका उद्योजकाच्या पत्नीकडून ही रक्कम वसूल केली होती. (Photo:@jacquelinef143/IG)
7/9

त्यानंतर या प्रकरणी सुकेशची पत्नी लीना पॉलचाही सहभाग असल्याचं स्पष्ट झालं होतं. ईडीनं त्यांचीही चौकशी केली होती.
8/9

तसेच ईडीनं अनेक ठिकाणी छापेमारीही केली होती. ज्यामध्ये चेन्नईच्या समुद्र किनाऱ्यानजिक स्थित त्यांच्या एका आलिशान बंगल्यातून 82.5 लाखंची रोख रक्कम, दोन किलो सोनं, 16 शानदार गाड्यांसह इतरही महागड्या वस्तूंचाही समावेश होतो.
9/9

एवढंच नाहीतर सध्या सुकेश आणि पत्नी रोहिणी दोघेही अटकेत आहेत. त्यांना 8 ऑगस्ट रोजी एका व्यावसायिकाकडून 50 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं अटक केली होती.
Published at : 24 Oct 2021 05:17 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























