एक्स्प्लोर
Aai Tuljabhavani Marathi Serial Track: आई राजा उदो उदो! 'आई तुळजाभवानी' मालिकेत देवीच्या आख्यायिकांचा 'नवा अध्याय'
Aai Tuljabhavani Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) आई तुळजाभवानी (Aai Tuljabhavani) या मालिकेत देवीच्या आख्यायिकांचे नवा अध्याय सुरू झाला आहे.
Aai Tuljabhavani Marathi Serial Track
1/8

या अध्यायातली बारकू गुरख्याची पहिली गोष्ट सध्या उलगडतेय.
2/8

देवीनं तुळजापूर परिसरात असंख्य भक्तांचा जो उद्धार केला, त्याच्या ज्या आख्यायिका आहेत, त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे, देवीनं भक्तांना परिस्थितीशी लढायचं, झुंजायचे बळ दिलं, संकटावर मात करण्याची दिशा दिली.
3/8

याच प्रेरणादायी रंजक आख्यायिका मालिकेत उलगडत आहेत. भोळसट बारकू गुरख्याच्या उद्धाराच्या गोष्टी सोबत महिषासुराचे संकटही आता गडद होत आहे.
4/8

महिषासुराचा आणि शुंभाचा विवाह संपन्न झाला असला तरी तुळजाचा त्याचा शोध अजून सुरू आहे, त्याच्या या शोधात अडथळा बनून उभी ठाकली आहे ती त्याचीच पत्नी शुंभा.
5/8

तिनं महिषासुराचेच हेर मारून परिस्थिति बिकट केली आहे.
6/8

शुंभाच्या मदतीला देवीच्या पावित्र्याच्या, मांगल्याच्या विरोधात असलेली अलक्ष्मी आली असून तिची काळी कारस्थान थेट देवीच्या भक्तांवर आघात करणारी आहेत.
7/8

अलक्ष्मीचा भूतलावर सुरू झालेला हाहाकार हा आई तुळजाभवानी समोर महिषासुराच्या वाढत्या उपद्रवासोबतच मोठे आव्हान ठरत आहे.
8/8

या परिस्थितीतही देवी आपल्या भक्तांना प्रेरणा देते त्याची ही विलक्षण रंजक गोष्ट आवर्जून अनुभवण्यासारखी आहे.
Published at : 24 Apr 2025 09:41 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई


















