एक्स्प्लोर
Sandip Dehpande MNS PC : शेलारांच्या मतरासंघात दुबार मतदार, परप्रांतिय मतदारांची नाव शेलारांनी टाकली का?
मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या मतदारसंघातील मतदार यादीत (Voter list) मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे, तर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) गंभीर टीका केली आहे. 'परप्रांतीय महापौर (Non-Marathi Mayor) करायचा म्हणून जास्तीत जास्त परप्रांतीय नावं घुसवण्याचा पराक्रम हा भारतीय जनता पक्ष करतेय का?', असा थेट सवाल संदीप देशपांडे यांनी केला. देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला की, शेलार यांच्या घराजवळील इमारतींमध्ये अस्तित्वात नसलेले घर क्रमांक वापरून बनावट मतदार घुसविण्यात आले आहेत. एवढेच नाही, तर एका मंदिराच्या पत्त्यावरही परप्रांतीय नावे मतदार म्हणून नोंदवली असल्याचा दावा त्यांनी केला. दुसरीकडे, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी, 'कोलार डाक्यावरच्या सत्तर हजार कोटींचा घोटाळा देखील आम्ही पाहिला', असे म्हणत नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला. याशिवाय, नाशिकमध्ये स्थानिक पातळीवर मनसे, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र निवडणुका लढणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















