जर 90 च्या दशकातील अभिनेत्रींचा उल्लेख करायचा असेल तर त्यामध्ये दिव्या भारती (Divya Bharti) यांचे नाव घेतलंच पाहिजे. कारण या काळात अशी कोणतीही अभिनेत्री नाही जिने काही महिन्यांत अशी जागा मिळविली, जी मिळविण्यासाठी अनेक वर्षे लागतात.
2/7
दिव्याचा पहिला बॉलिवूड चित्रपट 1992 मध्ये प्रदर्शित झाला आणि दुसर्या वर्षी 1993 मध्ये तिच्या रहस्यमय मृत्यूने लोकांना हादरवून टाकले. पण तिच्या केवळ एका वर्षाच्या कारकीर्दीमुळेच ती सुपरस्टार झाली. जरी बॉलिवूडपूर्वी दिव्या साऊथ सिनेमात काम करत होती, पण हिंदी फिल्म इंडस्ट्रीमुळे तिला वेगळी ओळख मिळाली.
3/7
जेव्हा दिव्या भारतीने जगाचा निरोप घेतला, तेव्हा तिचे वय अवघ्या 19 वर्षांचे होते. आयुष्याच्या या 19 वर्षात दिव्याने बालपण पाहिले, चित्रपटांचे जग पाहिले, यश पाहिले, कीर्ती पाहिली आणि विवाहित जीवनही जगली. होय, दिव्याचे गुप्तपणे साजिद नाडियाडवालाबरोबर लग्न झाले होते. दिव्य भारती हिच्या निधनानंतर ही बाब उघडकीस आली.
4/7
दिव्याचा पहिला बॉलिवूड चित्रपट 1992 मध्ये प्रदर्शित झाला आणि दुसर्या वर्षी 1993 मध्ये तिच्या रहस्यमय मृत्यूने लोकांना हादरवून टाकले. पण तिच्या केवळ एका वर्षाच्या कारकीर्दीमुळेच ती सुपरस्टार झाली. जरी बॉलिवूडपूर्वी दिव्या साऊथ सिनेमात काम करत होती, पण हिंदी फिल्म इंडस्ट्रीमुळे तिला वेगळी ओळख मिळाली.
5/7
या एका चित्रपटामुळे दिव्या भारतीची इतकी चर्चा झाली की तिला दिल का क्या कसूर, शोला और शबनम, दीवाना, बलवान सारख्या हिट चित्रपटांची ऑफर देण्यात आल्या. या सर्व चित्रपटांमध्ये तिच्या अपोजिट त्यावेळचे सुपरस्टार हिरो होते. एक एक करून दिव्या यशाच्या दिशेने प्रगती करत होती.
6/7
मीडिया रिपोर्टनुसार, दिव्य भारतीची ही प्रगती पाहून अन्य नायिका देखील घाबरल्या होत्या. दिव्याने काही महिन्यांत अनेक सिनेमे साईन केले होते. 1992 मध्ये तिचे 10 चित्रपट प्रदर्शित झाले. त्यानंतर 1993 आला.
7/7
वर्षाची सुरुवात उत्कृष्ट होती कारण तिचा हिंदीसह तेलगू चित्रपटही प्रदर्शित झाला होता. तिचे क्षत्रिय, रंग और शतरंज 1993 मध्ये प्रदर्शित झाले. क्षत्रिय 26 मार्च रोजी प्रसिद्ध झाला होता तर रंग और शतरंज प्रदर्षित होणे बाकी होते. अशावेळी 5 एप्रिलला तिच्या मृत्यूच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला. त्यावेळी दिव्या बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि अव्वल अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट होती. वयाच्या 19 व्या वर्षी तिचे निधन झाले. तिचा शेवटचा चित्रपट 'शतरंज' होता जो तिच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनंतर प्रदर्शित झाला.