एक्स्प्लोर
Share Market Closing Bell: 'या' स्टॉकमधील नफावसुलीने बाजारात चढ-उतार; आज शेअर बाजारात काय झालं?
Share Market Closing Bell: भारतीय शेअर बाजारात आज तेजीसह सुरुवात झाली तरी नफावसुलीने तेजीला ब्रेक लागला.
Share Market Closing Bell: 'या' स्टॉकमधील नफावसुलीने बाजारात चढ-उतार; आज शेअर बाजारात काय झालं?
1/9

आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहारांची सुरुवात तेजीसह झाली होती.
2/9

काही स्टॉक्समध्ये दिसून आलेल्या नफावसुलीने काही प्रमाणात अस्थिरता दिसून आली.
3/9

बँकिंग, आयटी आणि एफएमसीजी सेक्टरमध्ये नफावसुली दिसून आली.
4/9

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये खरेदीचा जोर दिसल्याने बाजारात तेजी दिसून आली. रिलायन्सचा शेअर 3.85 टक्क्यांच्या तेजीसह 2735 रुपयांवर स्थिरावला.
5/9

दिवसभरात तेजीत असणारा सेन्सेक्स बाजार बंद झाला तेव्हा फक्त 64 अंकांच्या तेजीसह 65,344 अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 9 स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली.
6/9

निफ्टी निर्देशांकही 24 अंकांच्या किरकोळ तेजीसह 19,355 अंकांवर स्थिरावला. निफ्टी 50 मधील 16 स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली.
7/9

मेटल्स, एनर्जी, इन्फ्रा, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमधील स्टॉक्स तेजीसह बंद झाले.
8/9

ऑटो, आयटी, एफएमसीजी, रिअल इस्टेट, मीडिया, हेल्थकेअर, फार्मा सेक्टर घसरणीसह बंद झाले.
9/9

मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 299.60 लाख कोटी इतके झाले. शुक्रवारच्या तुलनेत 8 हजार कोटींची घट झाली आहे.
Published at : 10 Jul 2023 05:14 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
पुणे






















