एक्स्प्लोर
Lenskart IPO : लेन्सकार्टचा आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, शेअर किती रुपयांवर पोहोचला?
Lenskart IPO : लेन्सकार्टचा आयपीओ भारतीय शेअर बाजारात लिस्ट झाला. या आयपीओतील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल, अशी अपेक्षा असणाऱ्यांची निराशा झाली.
लेन्सकार्ट
1/6

चष्मा बनवणारी कंपनी लेन्सकार्टचा आयपीओ भारतीय शेअर बाजारात लिस्ट झाला. आयपीओ ज्यांनी सबस्क्राईब केला होता आणि ज्यांना लॉट मिळाला होता त्यांची मात्र निराशा झाली आहे. लेन्सकार्टनं निश्चित केलेल्या किंमतपट्ट्यापेक्षा कमी किंमतीवर आयपीओ लिस्ट झाला.
2/6

नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरील सेन्सेक्स आणि निफ्टीवर लेन्सकार्टचा आयपीओ घसरणीसह लिस्ट झाला. बीएसईवर लेन्सकार्टचं लिस्टींग 390 रुपयांना झालं तर एनएसईवर 395 रुपयांना झालं. कंपनीनं किंमतपट्टा 402 रुपये निश्चित केला होता.
3/6

लेन्सकार्टच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा आयपीओ 28 पट सबस्क्राईब झाला होता. अँकर गुंतवणूकदारांकडून 3268.36 कोटी रुपये कंपनीनं जमवले होते. रिटेल कॅटेगरीत आयपीओ 7.56 पट, क्यूआयबी कॅटेगरीत आयपीओ 40.36 पट आणि एनआरआय कॅटेगरीत आयपीओ 18.23 पट सबस्क्राईब झाला होता.
4/6

लेन्सकार्टनं एका लॉटमध्ये 37 शेअर निश्चित केले होते. तर, गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी 14874 रुपयांची बोली लावणं गरजेचं होतं. मात्र, आयपीओ घसरणीसह लिस्ट झाल्यानं गुंतवणूकदारांचं नुकसान झालं.
5/6

लेन्सकार्टचा शेअर सुरुवातीच्या घसरणीनंतर सावरला. 1.25 मिनिटांवर लेन्सकार्टचा शेअर 405.30 वर ट्रेड करत होता. तर, लेन्सकार्टच्या शेअरनं 413.80 रुपयांचा उच्चांक गाठला होता.
6/6

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 10 Nov 2025 01:32 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























