एक्स्प्लोर
Gold Rate : सोन्याच्या दरात 5000 रुपयांची घसरण, चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवे दर
Gold Rate : जागतिक कारणांमुळं सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर 5000 रुपयांनी घसरले.
सोने दर
1/5

नवी दिल्ली : 2025 मध्ये सोन्याचे आणि चांदीचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. मात्र, देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर काही दिवसांमध्ये घसरत असल्याचं दिसून आलं आहे. 14 नोव्हेंबरला सोन्याचे दर 5000 रुपयांनी घसरुन 121895 रुपयांना एक तोळा यावर आले आहेत. इंट्राडेमध्ये ही अलीकडच्या काळातील मोठी घसरण आहे. चांदीच्या दरात देखील प्रति किलो मागं 8700 रुपयांची घसरण झाली आहे.
2/5

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात कपात करण्याबाबत अनिश्चिचतता असल्यानं सोन्याच्या दरात नरमाई आली आहे. 1 ऑक्टोबरपासून शटडाऊनमुळं सरकारी यंत्रणांवर परिणाम झाला आहे. आर्थिक आकड्यात घसरण झाल्यानं फेडरल रिझर्व्ह आणि अधिकारी सतर्क झाले आहेत.
3/5

सोने आणि चांदीच्या दरात 2025 या वर्षात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात ज्यांनी गंतवणूक केली आहे. त्यांना चांगला परतावा मिळाला आहे.
4/5

वेल्थ ग्लोब रिसर्चचे डायरेक्टर अनुज गुप्ता यांनी देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर 60 टक्क्यांनी म्हणजेच 47500 रुपयांनी वाढले आहेत. त्याचवेळी चांदीचे दर वार्षिक आधारावर 67700 रुपयांनी वाढले आहेत. नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या दरात टक्क्यांनी वाढले आहेत. म्हणजेच सोन्याचे दर 1262 रुपयांनी वाढले. तर, चांदीचे दर 6845 रुपयांनी वाढले.
5/5

अनुज गुप्ता यांनी सोन्याची विक्री करण्याची शिफारस केली आहे. त्यांनी सोन्याचे दर 127000 वर पोहोचल्यावर विक्री करावी, सोन्यासाठी स्टॉप लॉस 131000 रुपयांचा ठेववण्यास सांगितलं आहे. तर, चांदी 163000 रुपयांना विकावी असं सांगण्यात आलं आहे.
Published at : 14 Nov 2025 11:58 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























