एक्स्प्लोर
RBI MPC Meeting : बँकिंग क्षेत्रातील शेअरमध्ये तेजीची शक्यता, गुंतवणुकीपूर्वी दोन गोष्टी पाहा, आरबीआयचं पतधोरण गेमचेंजर ठरणार
RBI MPC Meeting :आरबीआयच्या पतधोरण बैठकीत रेपो रेट आणि इतर पतधोरण विषयक धोरणाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. आरबीआयची पतधोरण समितीची बैठक लवकरच होणार आहे.
बँकिंग सेक्टर
1/5

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण विषयक समितीच्या बैठकीपूर्वी बँकिंग क्षेत्रातील शेअर पु्न्हा चर्चेत आले आहेत. विश्लेषकांच्या मते बँकांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळू शकते.
2/5

आरबीआयच्या पतधोरण विषयक समितीच्या बैठकीत रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट यासह इतर आर्थिक धोरणांवर चर्चा होईल.
3/5

एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक या बँकांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळू शकते.
4/5

DGCA च्या आकडेवारीनुसार बँकिग क्षेत्राची शेअर बाजारातील भागिदारी वाढत आहे. खासगी बँकांचं डिजिटल रणनीतीद्वारे व्यवसाय वृद्धीचं नियोजन आहे. तर, सरकारी बँका सरकारी योजनांद्वारे कर्ज वितरण वाढवू शकतात.
5/5

बँकांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या बँकेचं ताळेबंदपत्रक चांगलं असेल आणि क्रेडिट ग्रोथ चांगली आहे का हे पाहावं असं तज्ज्ञांनी म्हटलं.(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 05 Dec 2024 12:00 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत


















