एक्स्प्लोर
Share Market: शेअर बाजारात आज तेजी, Sensex 600 अंकांनी वाढला
Stock Market Updates: शेअर बाजारात आज आयटी, एफएमसीजी आणि मेटल इंडेक्समध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं.

Stock Market Updates
1/9

शेअर बाजारात आज तेजी दिसून आली असून त्यामुळे गुंतवणूकदारांनी चांगलीच कमाई केली आहे. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 600 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये आज 158 अंकांची वाढ झाली.
2/9

सेन्सेक्समध्ये आज 0.99 टक्क्यांची वाढ होऊन तो 61,032 वर स्थिरावरा. तर निफ्टीमध्ये आज 0.89 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,929 अंकांवर स्थिरावला.
3/9

आज बाजार बंद होताना एकून 1252 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर 2158 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. आज एकून 114 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
4/9

आज बाजार बंद होताना UPL, ITC, Reliance Industries, Adani Ports आणि Adani Enterprises यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली.
5/9

तर Eicher Motors, Apollo Hospitals, SBI Life Insurance, Grasim Industries आणि BPCL कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली.
6/9

आज शेअर बाजार बंद होताना उर्जा आणि रिअॅलिटीच्या इंडेक्समध्ये एक टक्क्यांची घट झाली. तर आयटी, एफएमसीजी आणि मेटल इंडेक्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली.
7/9

बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये 0.4 टक्के तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.6 टक्क्यांची घट झाली.
8/9

शेअर बाजारातील आजच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांनी 19,000 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
9/9

मुंबई शेअर बाजारातील लिस्टेड कंपनींच्या एकूण भांडवलात वाढ होऊन ते 265.95 लाख कोटी रुपये इतकं झालं आहे. सोमवारी हे भांडवल 265.76 लाख कोटी रुपये इतकं होतं. त्यामुळे बीएसई लिस्टेड कंपन्यांच्या भांडवलात एकूण 19 हजार कोटींची भर पडली आहे.
Published at : 14 Feb 2023 05:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
लातूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
