एक्स्प्लोर
आयटीआर भरला पण आता रिफंड कधी येणार? वाचा सविस्तर...
ITR Filing : आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती. आता करदात्यांना त्यांच्या खात्यावर रिफंड कधी जमा होईल याची प्रतीक्षा आहे.

itr filing
1/7

Income Tax Return Filing: आर्थिक वर्ष 2023-24 आणि असेसमेंट वर्ष 2024-25 साठी आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ही 31 जुलैपर्यंत होती. 31 जुलैनंतर आयटीआर भरायचा असेल तर तुम्हाला विलंब शुल्क भरावे लागेल.
2/7

प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 31 जुलै पर्यंत देशातील 7.28 कोटी करदात्यांनी आयटीआर दाखल केलेला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी आयटीआर भरणाऱ्यांचे प्रमाण हे 7.5 टक्क्यांनी वाढले आहे. असेसमेंट ईअर 2023-24 मध्ये 31 जुलै पर्यंत 6.77 कोटी लोकांनी आयटीआर दाखल केला होता.
3/7

अनेक करदाते अे असतात जे वर्षभरात प्रमाणापेक्षा अधिक कर भरतात. अशआ करदातान्यांना नंतर करपरतावा दिला जातो. याच कारणामुळे आयटीआर दाखल केल्यानंतर किती दिवसांनी रिफंड मिळणार असे अनेक करदाते विचारतात.
4/7

आयटीआर फाईल केल्यानंतर 4 ते 5 आठवड्यांत आयटीआर करदात्यांच्या खात्यात रिफंड जमा होते..
5/7

ज्या दिवशी तुम्ही तुमचा आयटीआर व्हेरिफाय करता, त्याच्या 4 ते 5 आठवड्यानंतर तुम्हाला रिफंड मिळते.
6/7

चार ते पाच आठवड्यांनंतरही तुम्हाला रिफंड न मिळाल्यास तुम्ही इन्कम टॅक्सच्या ई-फाईलिंग पोर्टलवर जाऊन त्यासंबंधीची माहिती जाणून घेऊ शकता. यासह तुम्हाला प्राप्तिकर विभागाकडून ईमेल आणि मेसेजच्या मदतीनेही रिफंडबाबबत माहिती दिली जाते.
7/7

संग्रहित फोटो
Published at : 03 Aug 2024 04:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion