एक्स्प्लोर
इतर देशांच्या तुलनेत भारतात इंटरनेट खूपच स्लो; जगात कितवा क्रमांक?
Internet Speed In India: भारतात इंटरनेटचा स्पीड इतर देशांच्या तुलनेत मंदावत असल्याचे समोर आले आहे. ब्रॉडब्रॅण्ड स्पीडबाबत भारत पहिल्या 100 देशातही नाही.

Internet Speed in India
1/11

भारतात एकीकडे 5 जी इंटरनेटची (5G Internet) उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
2/11

5 जी इंटरनेटमुळे देशातील मोबाइल इंटरनेटमध्ये (Mobile Internet) क्रांती येईल असे दावे केले जात आहेत.
3/11

दुसऱ्या बाजूला भारतात सध्या वापरात असलेल्या इंटरनेटचा वेग कमालीचा मंदावला असल्याचे समोर आले आहे.
4/11

वेगवान इंटरनेट असणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या 100 देशांतही भारताचा (Internet Speed In India) समावेश नाही.
5/11

भारतात इंटरनेटचा स्पीड इतर देशांच्या तुलनेत मंदावत असल्याचे समोर आले आहे.
6/11

ग्लोबल स्पीड टेस्ट एजन्सी Ookla ने इंटरनेट स्पीडबाबत एक अहवाल जारी केला आहे.
7/11

ग्लोबल इंटरनेट स्पीडच्या यादीत ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात भारताची पिछेहाट झाली आहे. ब्रॉडब्रॅण्ड आणि मोबाइल इंटरनेट या दोन्हीच्या वेगात भारताची घसरण झाली आहे.
8/11

सप्टेंबर महिन्यात ब्रॉडब्रॅण्ड वेगाबाबत भारत 117 व्या स्थानाहून 118 व्या स्थानावर आला आहे.
9/11

मोबाइल इंटरनेट स्पीडबाबत भारत 78 व्या स्थानावरून 79 व्या स्थानावर आला आहे.
10/11

ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात भारतातील मोबाइल डाउनलोड स्पीड चांगला झाला आहे. ऑगस्ट महिन्यात मोबाइल डाउनलोड स्पीड 13.52Mbps इतका होता. सप्टेंबर महिन्यात यात वाढ होऊन तो 13.87Mbps इतका झाला.
11/11

इंटरनेट स्पीडच्या बाबतीत नॉर्वे देश पहिल्या स्थानावर आहे. मोबाइल इंटरनेटचा स्पीड नॉर्वेमध्ये सर्वाधिक आहे.
Published at : 22 Oct 2022 05:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
विश्व
आयपीएल
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
