एक्स्प्लोर
श्रीमंत व्हायचंय पण समजत नाही काय करू? सगळं सोडा फक्त 'या' पाच सवयी लावा, हातातला पैसा कधीच संपणार नाही!
गुंतवणुकीची आवड नसल्याने अनेकांना आयुष्यभर चणचण भासते. मात्र ही अडचण निर्माण होऊ नये म्हणून खालील पाच गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
best five saving trick (फोटो सौजन्य- META AI)
1/6

दिवाळीनिमित्त अनेकांच्या घरी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. कुटुंबात लक्ष्मीची कृपा कायम राहावी, धनसंपत्तीची चणचण भासू नये, असं या पूजेत लक्ष्मीला साकडं घातलं जातं. या दिवाळीनिमित्त तुम्ही खाल दिलेल्या पाच चांगल्या सवयी लावून घेतल्या तर तुम्हाला पैशांची चणचण कधीच भासणार नाही.
2/6

महिनाभर काम करून मिळालेला पगार अवघ्या पाच ते दहा दिवसांत संपून जातो. असा अनुभव अनेकांना येतो. अशा स्थितीमुळे पैशांची कायम चणचण भासते. ही आर्थिक चणचण भासू नये म्हणून कमाईतील एक हिस्सा कोणत्याही परिस्थितीत बचत म्हणून बाजूला ठेवून द्या.
3/6

योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुमच्या पैशांचे मूल्य वाढते. त्यामुळे गुंतवणुकीची सवय लावायला हवी. तुमच्या पगारातील कमीत कमी 20 टक्के रक्कम बचत म्हणून बाजूला ठेवल्यास उरलेल्या रकमेचा काही भाग तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवायला हवा. त्यामुळे तुमच्या पैशांचे मूल्य वाढेल.
4/6

अनेकजण इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतात. कर्जाच्या पैशातून अनेकजण आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी, मोबाईल घेण्यासाठी, शॉपिंग करण्यासाठी कर्ज काढतात. तुम्हीही असे करत अशाल तर ही सवय लगेच मोडा. कारण तुम्ही यामुळे कर्जाच्या विळख्यात अडकू शकता.
5/6

अनेकजण आरोग्य विमा काढण्यास टाळाटाळ करतात. आपल्याला कोणताही आजार होणार नाही, त्यामुळे विम्याची गरज नाही, असे अनेकांना वाटते. पण ऐनवेळी एखादा मोठा आजार डोके वर काढतो. त्यामुळे संबंधित आजारावर उपचार करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. यातच तुम्ही कंगाल होऊ शकतो. अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून आरोग्य विमा जरूर काढा.
6/6

अनेकांना मी फार श्रीमंत आहे, हे दाखवण्याची फार आवड असते. याच आवडीपाई अनेकजण महागड्या गाड्या, महागड्या घड्या, महागडे मोबाईल खरेदी करतात. अशा सवईमुळे कर्जबाजारी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे श्रीमंत दिसण्याऐवजी श्रीमंत होण्यासाठी स्वत:वर काम करा.
Published at : 26 Oct 2024 09:48 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















