एक्स्प्लोर
Online Shopping Frauds: ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणूक? अशी घ्या खबरदारी
Online Shopping: ऑनलाइन शॉपिंग करण्याकडे अनेकांचा कल वाढताना दिसत आहे. मात्र, त्याच वेळी फसवणुकीच्या घटना समोर येतात.
Online Shopping Frauds: ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणूक? अशी घ्या खबरदारी
1/11

ऑनलाइन शॉपिंगकडे सध्या अनेकांचा कल वाढत आहे.
2/11

वेगवेगळ्या ऑफर्स आणि घरपोच डिलिव्हरी यामुळे अनेकजण सामान खरेदीसाठी ई-कॉमर्स वेबसाइटला प्राधान्य देतात.
3/11

ऑनलाइन शॉपिंगच्या वाढत्या ट्रेंडमुळे त्याशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे.
4/11

ग्राहकाने मागवलेल्या वस्तू एक असतात आणि डिलिव्हरी दुसऱ्याच गोष्टीची झाली असल्याचा प्रकार समोर आला आहे.
5/11

अनेक वेळा लोकांना रिकामे खोके किंवा रद्दी, दगड, बटाटे यांसारख्या वस्तूही डिलिव्हरीमध्ये दिसून आल्या आहेत.
6/11

तुमच्यासोबतही असे काही घडले असेल तर तुम्ही त्याबाबत तक्रार नोंदवू शकता.
7/11

तुमची फसवणूक झाली असेल, तर सर्वप्रथम तुमच्या ई-कॉमर्स वेबसाइटवरूनच तक्रार करा. तुम्ही कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करून तुमची तक्रार नोंदवू शकता.
8/11

याशिवाय, तुम्ही तुमची तक्रार सरकारच्या तक्रार निवारण पोर्टल INGRAM (Integrated Grievance Redressal System) मध्ये देखील नोंदवू शकता.
9/11

तुम्ही तुमची तक्रार ग्राहक व्यवहार साइट Consumerhelpline.gov.in वर नोंदवू शकता.
10/11

यासोबतच तुम्ही ग्राहक न्यायालयात जाऊनही तुमची तक्रार नोंदवू शकता. याशिवाय सायबर गुन्ह्याच्या बाबतीत तुम्ही पोलिसांत तक्रार दाखल करू शकता.
11/11

ऑनलाइन खरेदी करताना, एखाद्या नामांकित ई-कॉमर्स साइटवरूनच वस्तू खरेदी करा. पहिल्यांदाच ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडा.
Published at : 06 Dec 2022 12:26 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























