एक्स्प्लोर

Lalbaugcha Raja 2025: लालबागचा राजाच्या मुखदर्शनाच्या लाईनमधील शेवटचा भाग्यवंत भक्त कोण? VIDEO व्हायरल

Lalbaugcha Raja 2025: आज अनंतचतुदर्शीच्या दिवशी मुंबईतील सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे विसर्जन केले जाणार आहे. लालबागचा राजाही विसर्जनासाठी मंडपातून निघणार आहे.

Lalbaugcha Raja 2025: मुंबईतील मानाच्या आणि प्रतिष्ठित गणपती मंडळांपैकी एक असणाऱ्या लालबाग सार्वजनिक उत्सव समितीकडून बसवण्यात येणाऱ्या लालबागचा राजाचे शनिवारी विसर्जन होणार आहे. थोड्याचवेळात लालबागचा राजा विसर्जन (Lalbaugcha Raja Visarjan 2025) मिरवणुकीसाठी मंडपातून निघणार आहे. लालबागचा राजा हा नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्याने या गणपतीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. दरवर्षी लालबागचा राजाचा नवस फेडण्यासाठी नवसाची भलीमोठी रांग लागते. लालबागचा राजाच्या पायांपाशी जाऊन दर्शन घेण्यासाठी अनेक तास वाट पाहावी लागते. त्यामुळे अनेक भाविक लालबागचा राजाचे मुखदर्शन घेऊन धन्यता मानतात. मात्र, लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठीही मोठी रांग असते. आज अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi) दिवशी लालबागचा राजाचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री 12 वाजता मुखदर्शनाची रांग बंद करण्यात आली. यानंतर भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन घेता आले नव्हते.

लालबागचा राजाची मुखदर्शनाची रांग बंद होताना काही भाग्यवंतांना राजाचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. याचा  एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत लालबागचा राजाच्या मुखदर्शनाच्या रांगेतील शेवटचा भक्त दिसत आहे. या शेवटच्या भक्ताचा लालबागचा राजा मंडळाकडून सत्कार करण्यात आला. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मिडीयावर अनेकजण या व्यक्तीला 'भाग्यवंत' म्हणत आहेत. 

लालबागचा राजा आता थोड्याचवेळात आपल्या मंडपातून गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ होईल. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक अनेक तास चालते. आज लालबागचा राजा मंडपातून निघत असला तरी तो उद्या सकाळी गिरगाव चौपाटीवर दाखल होईल. आता लालबागचा राजा हा लालबाग उड्डाणपूल, भायखळा स्टेशन,हिंदुस्थान मशीद, भायखळा अग्निशमन दल, नागपाडा चौक, गोल देऊळ, दो टाकी, ऑपेरा हाऊस ब्रिज ते गिरगाव चौपाटी असा प्रवास करेल. लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीलाही प्रचंड गर्दी असते. लालबागचा राजाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी अनेकजण गिरगाव चौपाटीवर गर्दी करतात. याठिकाणी भाविक लालबागचा राजाला साश्रू नयनांनी निरोप देतात. लालबागचा राजाला विशेष तराफ्यावर बसवून खोल समुद्रात नेले जाते आणि त्याठिकाणी या गणपतीचे विसर्जन केले जाते. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

आणखी वाचा

लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ भीषण दुर्घटना; 2 चिमुकल्यांना चिरडले, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Ganpati Visarjan 2025 LIVE: गणपती बाप्पा निघाले गावाला! मुंबईतील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणूक सोहळ्याला थोड्याचवेळात सुरुवात

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Maharashtra Weather Updates: चीनच्या 'डॉल्फिन'ने महाराष्ट्राचा पाऊस रोखला; आता पुन्हा मान्सूनचा जोर वाढणार, नेमकं काय घडलं?
चीनच्या 'डॉल्फिन'ने महाराष्ट्राचा पाऊस रोखला; आता पुन्हा मान्सूनचा जोर वाढणार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Embed widget