एक्स्प्लोर
FII Selling : विदेशी गुंतवणूकदारांनी 1.27 लाख कोटी भारतीय शेअर बाजारातून काढून घेतले, नेमकं काय घडलं? जाणून घ्या कारण
FII Selling : जागतिक आर्थिक राजकीय अस्थिरतेमुळं विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 2024-25 मध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम काढून घेतली आहे.
विदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरु
1/6

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेलं टॅरिफ, रशियासंदर्भातील अमेरिकेची आक्रमक भूमिका यामुळं वाढलेली अनिश्चितता आणि काही कंपन्यांचे पहिल्या तिमाहीतील कमजोर निकाल यामुळं विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेत आहेत. सेबीच्या रिपोर्टनुसार आर्थिक वर्ष 2024-25 विदेशी गुंतवणूकदारांनी भारताच्या इक्विटी सेगमेंटमधील 1.27 लाख कोटी रुपयांचे शेअर विकले.
2/6

आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या अस्थिरतेचा विदेशी गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. रेसिप्रोकल टॅरिफमुळं तणाव वाढल्यानं अमेरिकेच्या बाँडमध्ये तेजी आली आहे, त्यामुळं शेअर बाजारावरील गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला आहे. भारतीय शेअर बाजारातून इक्विटीमधून पैसे काढले तरी विदेशी गुंतवणूकदार डेब्ट सेगमेंटमध्ये सक्रिय आहेत. या सेगमेंटमध्ये 1.4 लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे.
Published at : 14 Aug 2025 05:14 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























