एक्स्प्लोर

Pune Crime: गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला दौंड हादरलं! बहिणीला पळवून नेल्याच्या संशयातून विटा,सिमेंटच्या चौकटीनं बेदम मारहाण, तरुणाने जीव सोडला

या घटनेची चौकशी वेगाने सुरू असून लवकरच आरोपींना ताब्यात घेऊन संपूर्ण प्रकरणाचा तपशील समोर येईल, असा विश्वास दौंड पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Pune Crime:पुण्यातील दौंड शहर गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला भीषण घटनेने हादरले आहे. बहिणीला पळवून नेल्याच्या वादातून चौघांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विटा आणि सिमेंटच्या चौकटीने केलेल्या जबर मारहाणीमुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला. खून झालेल्या तरुणाचे नाव केतन सुडगे असे असून तो स्थानिक रहिवासी होता. चार आरोपींनी त्याला अडवून निर्दयी मारहाण केली. या हल्ल्यात विटा आणि सिमेंटच्या चौकटीचा वापर करण्यात आला. गंभीर दुखापतींमुळे केतनचा मृत्यू झाला. या घटनेने दौंड परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.

पोलीस तपास सुरू

या प्रकरणी दौंड पोलिसांनी निखिल चितारे, प्रेम जाधव, विवेक कांबळे आणि विक्रांत कांबळे या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून हा खून घडल्याचे समोर आले आहे. आरोपींनी कट रचून केतनवर हल्ला केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.खूनानंतर आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपींवर खटला चालवला जाणार आहे. दरम्यान, हा प्रकार गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. या घटनेची चौकशी वेगाने सुरू असून लवकरच आरोपींना ताब्यात घेऊन संपूर्ण प्रकरणाचा तपशील समोर येईल, असा विश्वास दौंड पोलिसांनी व्यक्त केला आहे.

डीजेवर गाणं लावून आयुषला संपवलं?

पुण्यातील नाना पेठ परिसरात शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एकदा टोळीयुद्धाची घटना घडली. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच ठिकाणी माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची हत्या झाली होती. त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच त्यांच्या भाच्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकर (Ayush Komkar) असे मृत तरुणाचे नाव असून, या हत्येमुळे शहरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयुष कोमकर हा क्लासमधून घरी परत येत असताना, त्याच्या घराच्या खाली असलेल्या पार्किंगमध्ये दोघा अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर बेछुट गोळीबार केला. हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्यातील तीन गोळ्या आयुषला लागल्या. गंभीर जखमी झालेल्या आयुषला ससून रुग्णालयात नेण्यात आलं मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या हत्याकांडाबद्दल पोलिस तपास करत आहेत.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Embed widget